एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Emergency | इमर्जन्सी कंगना स्वत: दिग्दर्शित करणार

जवळपास एक वर्षं या इमर्जन्सी चित्रपटावर मी काम करते आहे. त्यानंतर आता मी या निष्कर्षाला पोचले आहे की लेखक रितेश शाह यांचं लिखाण आता मी दिग्दर्शित करेन.

कंगना रनौतने आज आपल्या कू या सोशल मीडियावरून एक नवीन माहीती चाहत्यांना दिली आहे. सध्या कंगना इमर्जन्सी या चित्रपटाच्या तयारीत आहे. इन्स्टाग्रामवर तिने त्याबद्दलचे काही फोटो टाकले होते. आपण या फोटोतून कसे इंदिरा गांधी यांच्या भूमिकेसाठी तयार होत आहे हे ती सांगत होती. तिचे हे फोटो खूपच गाजले आहेत. इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत कंगना कशी दिसेल याची वेगवेगळी चर्चा सुरू झाली आहे. असं असतानाच कंगनाने आणखी एक धक्का दिला आहे. 

कंगना रनौत आता इमर्जन्सी या चित्रपटासाठी दिग्दर्शनाची धुरा स्वत:च्या खांद्यावर घेणार आहे. यापूर्वी कंगनाने मणिकर्णिका या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. आता इंदिरा गांधी यांच्यावरच्या सिनेमाची धुराही तिने स्वत: आपल्याच खांद्यावर घ्यायचं ठरवलं आहे. याबद्दल कू वर लिहिताना ती म्हणते, मी आता पुन्हा दिग्दर्शनाची हॅट डोक्यावर घालायची ठरवलं आहे. जवळपास एक वर्षं या इमर्जन्सी चित्रपटावर मी काम करते आहे. त्यानंतर आता मी या निष्कर्षाला पोचले आहे की लेखक रितेश शाह यांचं लिखाण आता मी दिग्दर्शित करेन. हा प्रोजेक्ट घेतल्यामुळे मला अभिनयाच्या काही गोष्टींशी तडजोड करावी लागेल. पण मला ती मान्य आहे. हा सिनेमा एक उच्च कोटीचा सिनेमा होणार आहे. माझ्या अपेक्षा आता पुरेपूर उंचावल्या आहेत. हा सिनेमा मला वेगळ्या लीपमध्ये घेऊन जाईल.

रितेश शाह हे एक नावाजलेले लेखक आहे. त्यांनी आजवर लिहिलेल्या सिनेमांवर नजर टाकली तरी त्याचा अंदाज येतो. पिंक, कहानी, कहानी 2, रॉकी हँडसम अशा सिनेमांचा त्यात समावेश होतो. सगळ्यात महत्वाची बाब अशी की कंगनाचा आगामी धाकड या सिनेमाचं लेखनही रितेश यांनीच केलं आहे. कंगना रनौतकडे सध्या अनेक चांगले सिनेमे आहेत. यापैकीच थलैवी आणि दुसरा धाकड आहे. बायोपिक करण्यासाठी कंगनाकडे आता अनेक निर्माते रांगा लावू लागले आहेत. काही महिन्यांपूर्वी विद्या बालनकडे बायोपिक क्वीन म्हणून पाहिलं जात होतं. आता त्या शर्यतीत कंगनाचा समावेश झाला आहे. थलैवी हा सिनेमा तर ती करते आहेच. आता इमर्जन्सी या चित्रपटातून ती इंदिरा गांधी यांना मोठ्या पडद्यावर साकारणार आहे.  

गेल्या काही दिवसांपासून कंगना रनौत सतत चर्चेत आहे. सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर कंगनाने सातत्याने बॉलिवूडमध्ये असलेल्या नेपोटिझमवर भाष्य केलं होतं. या इंडस्ट्रीत सुरू असलेल्या घराणेशाहीपासून या इंडस्ट्रीत बोकाळलेल्या अमली पदार्थ सेवनाबद्दल कंगना उघड बोलली होती. त्यामुळे ती चर्चेत आली. तिच्या या बोलण्यामुळे तिला येत्या काळात चित्रपट मिळतील की नाही याबद्दल शंका होती. पण तसं न होता कंगनाच्या खिशात सध्या अनेक मोठे चित्रपट आहेत. कंगनाला सातत्याने मिळणारे राष्ट्रीय पुरस्कार पाहता अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये कंगनाला घेण्याकडे निर्मात्यांचा कल असतो. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
Jay Shah ICC Chairman : आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
Rohit Pawar : रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 4 PM : 01 डिसेंबर 2024 : ABP MajhaAvinash Jadhav News:विधानसभेतील पराभवानंतर अविनाश जाधव यांचा मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामाABP Majha Marathi News Headlines 4 PM TOP Headlines 4 PM 01 December 2024ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 01 December 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
Jay Shah ICC Chairman : आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
Rohit Pawar : रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल
ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल
Suhas Kande : नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच! भुजबळ आग्रही असतानाच सुहास कांदेंची एंन्ट्री; भावी पालकमंत्री म्हणून झळकले बॅनर
नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच! भुजबळ आग्रही असतानाच सुहास कांदेंची एंन्ट्री; भावी पालकमंत्री म्हणून झळकले बॅनर
नवस फिटला... रोहित पवारांनी कुठं 5 तर कुठं 11 नारळांचं तोरण बांधलं, वाजत गाजत देवाला नमस्कार
नवस फिटला... रोहित पवारांनी कुठं 5 तर कुठं 11 नारळांचं तोरण बांधलं, वाजत गाजत देवाला नमस्कार
Mohan Bhagwat: प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुलं हवीत, लोकसंख्या शास्त्राचा हवाला देत डॉ. मोहन भागवतांचे मोठे विधान
प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुलं हवीत, लोकसंख्या शास्त्राचा हवाला देत डॉ. मोहन भागवतांचे मोठे विधान
Embed widget