शिमला : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत आणि शिवसेना नेत संजय राऊत यांच्यातील वाकयुद्ध सुरुच आहे. अभिनेत्री कंगनाने मुंबई पोलीसांसोबत केलेल्या वक्तव्यानंतर या प्रकरणाला सुरुवात झाली. त्यानंतर कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळणं मिळालं. संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी कंगनाच्या वक्तव्याचा निषेध करत तिच्याविरोधात आंदोलनं केली, तर अनेक ठिकाणी तिच्या पोस्टरही जाळण्यात आलं. अशातच कंगनाने ती 9 सप्टेंबर रोजी मुंबईत येणार आहे, कोणात हिंम्मत असेल तर अडवून दाखवा, असा इशारा देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी कंगनाला सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे.
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी रविवारी सांगितले की, 'राज्य सरकारने बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतला राज्यात सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कंगनाच्या मुंबई प्रवासा दरम्यानही सुरक्षा उपलब्ध करून देण्याचा विचार सरकार करत असल्याचं त्यांनी सांगितलं. भाजप आमदारांसोबत झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी पत्रकारांना यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले की, 'कंगनाला सुरक्षा देणं आमचं कर्तव्य आहे. कारण ती हिमाचल प्रदेशची मुलगी आहे आणि एक सेलिब्रिटी आहे.'
अभिमानाने सांगते मी मराठा आहे, तुम्हाला काय करायचं ते करा; कंगनाचा पलटवार
कंगनाचे वडिल आणि बहिणीची राज्य सरकारकडे मागणी
पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना ठाकूर म्हणाले की, कंगना रनौतची बहिण आणि तिच्या वडिलांनी राज्य सरकारकडे कंगनाला सुरक्षा देण्याची मागणी केली होती. ठाकुर म्हणाले की, 'कंगनाची बहिण रंगोली (रंगोली चंदेल)ने काल मला फोन केला आणि माझ्याशी चर्चा केली. कंगनाच्या वडिलांनीही राज्यातील पोलिसांना पत्र लिहून सुरक्षा देण्याची मागणी केली. त्यामुळे मी डीजीपीशी राज्यात अभिनेत्रीला सुरक्षा देण्याचे आदेश दिले.'
पाहा व्हिडीओ : कंगनाला हिमाचल प्रदेश सरकारने सुरक्षा पुरवली, मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांची माहिती
मुंबईतही हिमाचल प्रदेश पोलीस सुरक्षा देणार?
मुख्यमंत्री ठाकूर म्हणाले की, अभिनेत्री 9 सप्टेंबर रोजी मुंबईत जाणार आहे आणि यादरम्यानही सरकार त्यांना सुरक्षा देण्यावर विचार करत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी कंगना रनौत करत असलेल्या वक्तव्यावर काहीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. ते म्हणाले की, या प्रकरणाचा तपास सुरु आहे. त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्याद्वारे अभिनेत्री कंगनाला धमक्या देण्यात येत असल्याच्या दाव्यावर काहीही बोलण्यास नकार दिला.
महत्त्वाच्या बातम्या :
- कंगनाला मुंबईत राहण्याचा कोणताही अधिकार नाही : गृहमंत्री
- पोकळ धमक्या देत नाही, मी ॲक्शन करणारा माणूस : संजय राऊत
- मी येणार, कुणाच्या बापामध्ये हिंमत असेल तर मला अडवा : कंगना रणौत
- मुंबई पोलिसांबद्दल 'जजमेंटल' होऊन 'पंगा' घेऊ नये, मनसेचा कंगनाला इशारा
- 'उचलली जीभ, लावली टाळ्याला', रेणुका शहाणेंचा कंगनावर संताप, तर कंगना म्हणते...
- कंगना रानौतकडून मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरबरोबर; सोशल मीडियावर संताप