मुंबई : अभिनेत्री कंगना रणौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मिरसोबत केल्यानंतर सोशल मीडियात कंगनाविरोधात टीकेची झोड उठली आहे. कंगना रणौतनं मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने संताप व्यक्त केला जात आहे. मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटू लागली आहे अशी टीका कंगनाने ट्विटवरुन केली होती. यानंतर अनेक सेलिब्रिटींनी कंगनाचा समाचार घेतला आहे. यानंतर जोरदार राजकारण देखील सुरु झाले आहे. यात आता मनसेनं देखील उडी घेतली आहे. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी कंगनाच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या मुंबई पोलिसांबद्दल ‘जजमेंटल’ होऊन कुणीही ‘पंगा’ घेऊ नये असं म्हटलं आहे. याला धमकी समजा किंवा सल्ला. पण माझ्या मुंबई पोलिसांबद्दल काही बरळेललं मीच काय, कोणताही सच्चा मुंबईकर सहन करणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे.


'उचलली जीभ, लावली टाळ्याला', रेणुका शहाणेंचा कंगनावर संताप, तर कंगना म्हणते...


खोपकर यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, 'माझ्या मुंबई पोलिसांबद्दल ‘जजमेंटल’ होऊन कुणीही ‘पंगा’ घेऊ नये. मुंबईत आज आमच्या बहिणी मध्यरात्रीसुद्धा कामावरुन घरी बिनधास्तपणे जातात, याला कारण आहेत माझे मुंबई पोलीस. आज मुंबईत मी सुरक्षित आहे ते केवळ माझ्या मुंबई पोलिसांमुळे. कामाचा कितीही ताण असो, पगार अनियमित असो, मनुष्यबळ कमी असो, ऊन असो-पाऊस असो…कशीचीही पर्वा न करता हिंमतीने पाय रोवून उभे राहतात ते माझे मुंबई पोलीस. ज्या कुणाला माझ्या या मुंबई पोलिसांची भीती वाटते त्यांनी खुशाल आपापल्या राज्यात जाऊन असुरक्षित राहावं. याला धमकी समजा किंवा सल्ला. पण माझ्या मुंबई पोलिसांबद्दल काही बरळेललं मीच काय, कोणताही सच्चा मुंबईकर सहन करणार नाही'.





राम कदमांची नार्को टेस्ट करा- काँग्रेसची मागणी
कंगनाची पाठराखण करणाऱ्या भाजप नेते राम कदम यांच्यावर निशाणा साधत त्यांची नार्को टेस्ट करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच राम कदम यांच्यावर निशाणा साधताना काँग्रेसने विवेक मोईत्राचीही आठवण करून दिली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमधून त्यांनी भाजप नेते राम कदम यांच्या नार्को टेस्टची मागणी केली आहे. तसेच सचिन सावंत यांनी आवर्जुन विवेक मोईत्रा यांचाही उल्लेख केला आहे. तसेच कंगनाला भाजपच्या आयटीसेलची साथ आहे. हे मिळून भाजप घाणेरडं राजकारण करत असल्याचा आरोप सचिन सावंत यांनी केला आहे.


कंगना रानौतकडून मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरबरोबर; सोशल मीडियावर संताप


सचिन सावंत यांनी आपल्या ट्वीटमध्ये आवर्जुन विवेक मोईत्रा यांचाही उल्लेख केला आहे. विवेक मोईत्रा यांचा याआधी ड्रग्जसंदर्भात उल्लेख आला होता. परंतु, ती गोष्ट राहुल महाजन यांच्या संदर्भात होती. राहुल महाजन आणि राम कदम हे मित्र होते. त्यामुळे या ट्वीटमध्ये सचिन सावंत यांनी आवर्जुन विवेक मोईत्रा यांचा उल्लेख केला असल्याचं बोललं जात आहे. यासंदर्भात ट्वीट करताना सचिन सावंत म्हणाले की, 'विवेक मोईत्रा यांच्यापासून राम कदम यांना ड्रग विक्री पुरवठ्याबाबत माहिती आहे. त्यांचे बॉलिवूड संबंधही घनिष्ठ आहेत. त्यामुळे त्यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी आम्ही करत आहोत.भाजपा कार्यालयात 53 वेळा फोन करून संदीप सिंग कोणाशी बोलत होता व भाजपाचे ड्रग माफिया संबंध ही उघड होतील.'


...तर चंबू गबाळ आवरुन आपल्या राज्यात जावं; संजय राऊतांकडून कंगनाचा समाचार


या क्षणाला सांगाल त्या ठिकाणी मी यायला तयार आहे : राम कदम


सचिन सावंत यांच्या ट्वीटला उत्तर देत राम कदम यांनी ट्वीट केलं आहे. राम कदम ट्वीटमध्ये म्हणाले की, 'छत्रपती शिवरायांना मानणारा मी मावळा आहे उद्या नव्हे ,या क्षणाला सांगाल त्या ठिकाणी मी यायला तयार आहे मी व माझ्या संपूर्ण कुटुंबाची नार्को टेस्ट करावी. तयार आहे पण मात्र या प्रकरणात अडकलेले तुमच्या सरकारचे बडे नेते , मंत्री नार्को टेस्ट करायाला तयार आहेत का ? ते तपासून पहा.'


महत्त्वाच्या बातम्या :