Kangana Ranaut's Emergency Movie : आणीबाणीची गोष्ट उलगडणार कंगना, इमर्जन्सी चित्रपटाची रिलीज डेटची घोषणा
Kangana Ranaut's Emergency Movie : भारतात आणी बाणी लागू होण्याच्या 50 व्या वर्षपूर्तीला कंगना रणौतने इमर्जन्सी चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख जाहीर केली आहे. 6 सप्टेंबरला इमर्जन्सी चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
Emergency Movie Release Date : अभिनेत्री कंगना रणौतच्या (Kangana Ranaut) 'इमर्जन्सी' चित्रपटाची (Emergency Movie) रिलीझ डेट (Release Date) अखेर समोर आली आहे. कंगनाचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित इमर्जन्सी चित्रपट 6 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. कंगना रणौतने याआधी लोकसभा निवडणुकीमुळे (Lok Sabha 2024 Election Campaign) हा चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख पुढे ढकलली होती. अखेर हा चित्रपट प्रदर्शित होण्या अखेर मुहूर्त सापडला आहे. कंगनाने इमर्जन्सी चित्रपट प्रदर्शित होण्याच्या तारखेची घोषणा केली आहे. कंगनाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत हा चित्रपट शुक्रवारी, 6 सप्टेंबरला रिलीझ होणार असल्याचं सांगितलं आहे.
कंगना उलगडणार भारतीय इतिहासातील वादग्रस्त कथा
भारतात आणी बाणी लागू होण्याच्या 50 व्या वर्षपूर्तीला कंगना रणौतने इमर्जन्सी चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख जाहीर केली आहे. पोस्टरसह चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख जाहीर करताना कंगनाने शेअर केलेल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'स्वतंत्र भारताच्या सर्वात गडद अध्यायाच्या 50 व्या वर्षाची सुरुवात. कंगना रणौतचा इमर्जन्सी चित्रपट 6 सप्टेंबर 2024 रोजी सिनेमागृहात. भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील सर्वात वादग्रस्त भागाची स्फोटक गाथा.'
इंदिरा गांधींच्या भूमिकेत कंगना रुपेरी पडद्यावर
इमर्जन्सी चित्रपटात कंगना रणौत भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. देशातील अंतर्गत आणि बाह्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर 25 जून 1975 रोजी भारतात 21 महिन्यांसाठी आणीबाणी लागू करण्यात आली होती. या चित्रपटात कंगना रणौतसोबत अनुपम खेर, मिलिंद सोमन, श्रेयस तळपदे, महिमा चौधरी आणि दिवंगत सतीश कौशिक हे कलाकार झळकणार आहेत. या चित्रपटाची कथा कंगनाने लिहिली असून दिग्दशर्काची धुराही तिनेच सांभाळली आहे.
View this post on Instagram
लोकसभा निवडणुकीनंतर कंगना पुन्हा मोठा पडदा गाजवण्यास सज्ज
लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर अभिनेत्री कंगना राणौत आता तिच्या फिल्मी करिअरवर लक्ष केंद्रीत करताना दिसत आहे. तिच्या'इमर्जन्सी' चित्रपटाबाबत अपडेट समोर आली आहे. अनेकवेळा प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलल्यानंतर आता हा चित्रपट अखेरीस 6 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. 25 जून रोजी आणीबाणीच्या वर्धापनदिनी, कंगनाने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर करून रिलीजची तारीख जाहीर केली आहे.
कंगनाने या चित्रपटाबाबत प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की,, "मी विल्यम शेक्सपियरच्या मॅकबेथपासून प्रेरित आहे. 'आणीबाणी' हा भारतीय लोकशाहीचा सर्वात वादग्रस्त अध्याय आहे आणि मी 6 सप्टेंबर 2024 रोजी हा चित्रपट जगभरात प्रदर्शित होण्याची आतुरतेने वाट पाहत आहे.