(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बलात्काराच्या आरोपात कंगना रनौतचा बॉडीगार्ड कुमार हेगडेला कर्नाटकात अटक
बलात्काराच्या आरोपात बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतचा बॉडीगार्ड कुमार हेगडे याला कर्नाटकातून अटक करण्यात आली आहे.मुंबई पोलीस आरोपीला कर्नाटकहून मुंबईला घेऊन येत आहेत, रविवार आणि सोमवारच्या दरम्यान ते दादरला पोहचण्याची शक्यता आहे.
मुंबई : नुकतीच मुंबईच्या ब्यूटिशियनने कंगना रनौतचा खाजगी अंगरक्षक कुमार हेगडे याच्यावर लग्नाचे आश्वासन देऊन तिच्यावर अनेकवेळा बलात्कार केला आहे. मुंबईतील डी. एन. नगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तेव्हापासून मुंबई पोलिस कुमार हेगडे याचा शोध घेत होते. अखेर कर्नाटकातील कुमार हेगडेच्या गावी जाऊन मुंबई पोलिसांचा शोध संपला.
मुंबईचे डी.एन. नगर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी आरोपी कुमार हेगडे याला त्याच्या गावातून अटक केली. विशेष म्हणजे कुमार हेगडे स्वतःच्या लग्नासंदर्भात कर्नाटकातील मांड्या जिल्ह्यातील हेग्गादहाली या गावी गेला होता. 28 एप्रिलपासून त्याचा फोन स्विच येत होता. अशा परिस्थितीत त्याच्यासोबत लीन इनमध्ये राहणारी पीडिता आणि पोलीस अधिकारी त्याच्याशी संपर्क साधू शकले नाहीत.
कुमार हेगडे याला अटक करण्यासाठी गेलेल्या मुंबई पोलिसांनी पीडित युवतीला तिची मैत्रिण दिव्या कोटियानला मुंबईहून कर्नाटकला नेले होते. शनिवारी अटकेनंतर कुमार हेगडे याला मुंबईत आणण्याची प्रक्रिया पूर्ण करताना पोलिसांनी तेथील स्थानिक न्यायालयातही हजर केले.
कुमार हेगडेच्या अटकेच्या बातमीला दुजोरा देताना पीडितेची मैत्रिण दिव्या कोटियानने एबीपी न्यूजला सांगितले, की “यावेळी मी, माझी मैत्रिण (पीडिता) आरोपी कुमार हेगडे आणि मुंबईहून कर्नाटकला अटक करण्यासाठी आलेले पोलीस अधिकारी सर्वजण कर्नाटकहून रेल्वेने परत येत आहोत. म्हैसूर-दादर एक्स्प्रेसने रविवार आणि सोमवार दरम्यान आम्ही सर्व मुंबई गाठू."
दिव्या कोटियानं हिनेच ब्यूटिशियन मैत्रिणीला कुमार हेगडेविरोधात पोलिसांकडे तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. यासाठी तिला मदत देखील केली. यानंतर, दिव्याने एबीपी न्यूजशी बोलताना सांगितले की, कुमार हेगडेने तिच्या मैत्रिणीबरोबर अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवले असून तिच्याकडून 50 हजार रुपयेही घेतले आहेत.
काय आहे प्रकरण?
मुंबईच्या डी. एन. नगर पोलीस ठाण्यात कुमार हेगडे याच्याविरोधात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, आरोपी आणि पीडिता हे गेल्या 8 वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. पण वर्षभरापूर्वी आरोपीने पीडितेला लग्नाचा आश्वासन दिले आणि तेव्हापासून आरोपी व पीडिता दोघेही लिव्ह-इन पार्टनर म्हणून राहत होते. पीडितेच्या म्हणण्यानुसार लग्नाचे आश्वासन देऊन आरोपीने तिच्यावर अनेकदा तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर आरोपीने आपल्या आश्वासनांकडे दुर्लक्ष केले आणि आईच्या मृत्यूचा बहाणा करुन आपल्या गावी निघून गेला. पण, नंतर पीडित मुलीला समजले की कुमार हेगडे लग्न करण्यासाठी आपल्या गावी गेला आहे. अशा परिस्थितीत लग्नाच्या तयारी दरम्यान मुंबई पोलिसांनी कर्नाटकातील कुमार हेगडे याला त्याच्या गावी अटक केली आहे.