एक्स्प्लोर

Kangana Ranaut On Anant Radhika Pre Wedding Function : अंबानींनी बोलावलं नाहीतर स्वत:ची तुलना लता मंगेशकरांसोबत केली, नेटकऱ्यांनी कंगनाला सुनावले

Kangana Ranaut : अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग सोहळ्यात का हजर राहिली नाही, यावर भाष्य करताना कंगनाने लता मंगेशकर यांच्यासोबत स्वत: ची तुलना केली असल्याचे युजर्सने म्हटले.

Kangana Ranaut Latest News :  रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट यांचा शाही प्री-वेडिंग सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला अभिनेत्री कंगणा रनौत (Kangana Ranaut) दिसली नाही. त्यामुळे तिला अंबानींनी  आमंत्रण दिल्याची चर्चा नव्हती. कंगनाने आपल्या इन्स्टा स्टोरीवर या चर्चांवर सूचक पोस्ट केली. कंगनाच्या या इन्स्टा स्टोरीवर युजर्सने तिला सुनावले आहे. 

कंगनाने  इन्स्टा स्टोरीवर सूचक पोस्ट केली. यामध्ये तिने प्री-वेडिंग सोहळ्यात सहभागी न होण्याबाबत भाष्य केले. कंगनाने एका वृत्तपत्रात लता मंगेशकर यांना चांगल्या मानधनाची ऑफर असूनही त्यांनी खासगी कार्यक्रमास जाणे टाळले, याबाबतची ती बातमी होती. लता मंगेशकर यांची बातमी शेअर करत कंगनाने आपले म्हणणं मांडले.कंगनाने आपल्या इन्स्टास्टोरी पोस्ट मध्ये म्हटले की, 'मला आर्थिक अडचणींचा खूपच सामना करावा लागला. पण लताजी आणि मी असे दोनच लोक आहोत ज्यांची गाणी सर्वाधिक हिट झाली. (फॅशन का जलवा,  लंडन ठुमकदा, विजय भव) पण मी कधीच कोणत्याही लग्न सोहळ्यात नाचली नाही. मला  अनेक आयटम साँगही ऑफर झाले होते असेही कंगनाने म्हटले. 

कंगनाने आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हटले की, मी पुरस्कार सोहळ्यापासूनही दूर राहू लागली आहे. प्रसिद्धी आणि पैशाला नाही म्हणण्यासाठी एक मजबूत व्यक्तिमत्व आणि प्रतिष्ठा लागते. आजच्या शॉर्टकटच्या काळात तरुणांनी हे समजून घेण्याची गरज आहे की जे प्रामाणिक आहेत तेच पैसे कमवू शकतात असेही कंगनाने म्हटले. 

Kangana Ranaut On Anant Radhika Pre Wedding Function  : अंबानींनी बोलावलं नाहीतर स्वत:ची तुलना लता मंगेशकरांसोबत केली, नेटकऱ्यांनी कंगनाला सुनावले

कंगनावर युजर्सची सडकून टीका

कंगनाच्या या पोस्टनंतर युजर्सने तिच्यावर सडकून टीका केली आहे. काहींनी तिला थेट सुनावत, अंबानींनी तुला लग्नाचे आमंत्रण दिले नाही म्हणून तुझी तुलना लता मंगेशकरशी केलीस? आता दिलजीत म्हणजे काय आणि तू काय आहेस हे समजलं का? असेही तिला सुनावले.

Kangana Ranaut On Anant Radhika Pre Wedding Function  : अंबानींनी बोलावलं नाहीतर स्वत:ची तुलना लता मंगेशकरांसोबत केली, नेटकऱ्यांनी कंगनाला सुनावले

तुझी ही इन्स्टा स्टोरी पोस्ट म्हणजे तू  असुरक्षित आणि एकटी असल्याचा पुरावा असल्याचे एका युजरने म्हटले. तू तुझ्या कर्मामुळे एकटी पडली असल्याचे युजरने तिला सुनावले आहे.   तुझा मुद्दा सिद्ध करण्यासाठी  काय लिहिलं याने काही फरक पडत नाही, पण लता मंगेशकरांशी तुमची तुलना करणे थांबवा असेही युजरने म्हटले.

अंबानींच्या सोहळ्याला बॉलिवूडकरांनी केली धमाल

या सोहळ्यासाठी जे बॉलिवूड कलाकार उपस्थित होते, त्यांनी यामध्ये बरीच धम्माल केली.  सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान या तिघांनी एकत्र केलेला डान्स विशेष गाजला. अंबानी कुटुंबातील सदस्यांनीही कार्यक्रमात परफॉर्म केले. मेटा सीईओ मार्क झुकेरबर्ग, मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी आणि सल्लागार इवांका ट्रम्प यांनीही या सोहळ्यासाठी हजेरी लावली होती. 

 इतर संबंधित बातमी :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हिंगोली पोलिस कर्मचारी गोळीबार प्रकरण! पत्नी आणि मेहुण्यानंतर आज सासूसाचाही मृत्यू, मृतांची संख्या 3 वर 
हिंगोली पोलिस कर्मचारी गोळीबार प्रकरण! पत्नी आणि मेहुण्यानंतर आज सासूसाचाही मृत्यू, मृतांची संख्या 3 वर 
AI चा वापर, गुगलशी करार; मुख्यमंत्र्यांसमोर पुढील 100 दिवसांच्या कामाचं प्लॅनिंग, रस्ते सुरक्षेवर भर
AI चा वापर, गुगलशी करार; मुख्यमंत्र्यांसमोर पुढील 100 दिवसांच्या कामाचं प्लॅनिंग, रस्ते सुरक्षेवर भर
Suresh Dhas on Prajakta Mali : मला प्राजक्ताताईंचा अपमान करायचा नव्हता,धस यांनी व्यक्त केली दिलगिरी
Suresh Dhas on Prajakta Mali : मला प्राजक्ताताईंचा अपमान करायचा नव्हता,धस यांनी व्यक्त केली दिलगिरी
Beed Railway: बीडकरांसाठी गुडन्यूज, राजुरीपर्यंत धावली रेल्वे; 26 जानेवारीपर्यंत बीडमध्ये पोहोचणार आगीनगाडी
Beed Railway: बीडकरांसाठी गुडन्यूज, राजुरीपर्यंत धावली रेल्वे; 26 जानेवारीपर्यंत बीडमध्ये पोहोचणार आगीनगाडी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Navneet Kanwat on Walmik Karad : वाल्मिक कराडसोबत पोलीस आहेत? पोलीस अधीक्षक म्हणाले,माहिती घेतोयSuresh Dhas on Prajakta Mali : मला प्राजक्ताताईंचा अपमान करायचा नव्हता,धस यांनी व्यक्त केली दिलगिरीSantosh Deshmukh Wife Beed : मला वाटतं मीच कुणाला मारून येऊ, संतोष देशमुखांच्या पत्नीचा आक्रोषRamdas Athawale Full PC : मला वाटतं धनंजय मुंडेंचे थेट संबंध नाहीत, रामदास आठवले यांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिंगोली पोलिस कर्मचारी गोळीबार प्रकरण! पत्नी आणि मेहुण्यानंतर आज सासूसाचाही मृत्यू, मृतांची संख्या 3 वर 
हिंगोली पोलिस कर्मचारी गोळीबार प्रकरण! पत्नी आणि मेहुण्यानंतर आज सासूसाचाही मृत्यू, मृतांची संख्या 3 वर 
AI चा वापर, गुगलशी करार; मुख्यमंत्र्यांसमोर पुढील 100 दिवसांच्या कामाचं प्लॅनिंग, रस्ते सुरक्षेवर भर
AI चा वापर, गुगलशी करार; मुख्यमंत्र्यांसमोर पुढील 100 दिवसांच्या कामाचं प्लॅनिंग, रस्ते सुरक्षेवर भर
Suresh Dhas on Prajakta Mali : मला प्राजक्ताताईंचा अपमान करायचा नव्हता,धस यांनी व्यक्त केली दिलगिरी
Suresh Dhas on Prajakta Mali : मला प्राजक्ताताईंचा अपमान करायचा नव्हता,धस यांनी व्यक्त केली दिलगिरी
Beed Railway: बीडकरांसाठी गुडन्यूज, राजुरीपर्यंत धावली रेल्वे; 26 जानेवारीपर्यंत बीडमध्ये पोहोचणार आगीनगाडी
Beed Railway: बीडकरांसाठी गुडन्यूज, राजुरीपर्यंत धावली रेल्वे; 26 जानेवारीपर्यंत बीडमध्ये पोहोचणार आगीनगाडी
Suresh Dhas : प्राजक्ताताईंची प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो, सुरेश धस यांनी भाजपमधून कुणाचा फोन आला ते सांगितलं, म्हणाले...
इतरांना वाटत असेल तू चुकलाय तर.... भाजपच्या वरिष्ठ नेत्याचा सल्ला अन् सुरेश धस यांचा दिलगिरीचा निर्णय
मी प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो; प्राजक्ता माळींनी फडणवीसांची भेट घेताच सुरेश धसांचा यु-टर्न
मी प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो; प्राजक्ता माळींनी फडणवीसांची भेट घेताच सुरेश धसांचा यु-टर्न
सोशल मीडियावर फोटो व्हिडीओद्वारे दहशत माजवणं महागात पडणार, गुन्हे दाखल करणार, बीडच्या एसपींचा इशारा 
'...त्यांचे शस्त्र परवाने रद्द करणार' बीडचे SP नवनीत कॉवत यांची माहिती, दहशत माजवणाऱ्यांना इशारा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 डिसेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 डिसेंबर 2024 | सोमवार
Embed widget