Kangana Ranaut : "शेवटी राक्षसच जिंकला..."; श्रद्धा वालकर प्रकरणामुळे कंगना दुखावली
Shraddha Walker Case : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणावर भाष्य केलं आहे.
Kangana Ranaut Reacts On Shraddha Walkar Case : बॉलिवूडची पंगाक्वीन कंगना रनौत (Kangana Ranaut) नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत असते. आता तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणावर भाष्य केलं आहे. कंगनाने म्हटलं आहे,"ती एक मुलगी होती आणि तिच्या आत एक स्त्रीचं मन होतं".
कंगनाने 2020 साली पोलिसांना लिहिलेलं पत्र शेअर करत लिहिलं आहे,"श्रद्धाने हे पत्र 2020 मध्ये लिहिलं होतं. आफताबपासून वाचण्यासाठी तिला पोलिसांची मदत हवी होती. त्याने अनेकदा तिला घाबरवलं आहे. तसेच तुकडे करण्याची धमकी दिली आहे. त्याने तिला ब्लॅकमेल करत जगापासून वेगळं केलं आहे".
कंगनाने पुढे लिहिलं आहे,"आफताबने श्रद्धाला लग्नाचं वचन दिलं होतं. ती काही कमजोर नव्हती. ती एक मुलगी होती. या जगात जगण्यासाठी ती जन्माला आली होती. पण तिच्या आत एक स्त्रीचं मन होतं. पृथ्वीप्रमाणेच स्त्रीलादेखील गर्भ आहे. त्यामुळे ती कधी कोणासोबत भेदभाव करत नाही"
ती परीकथेत रमणारी मुलगी होती. तिला त्या कथांवर विश्वास होता. जगाला तिच्या प्रेमाची गरज आहे असं तिला वाटत होतं. परीकथेतल्या राक्षसासोबत लढण्याचा ती प्रयत्न करत होती. त्या राक्षसाला मारण्याचे तिने खूप प्रयत्न केले. पण शेवटी राक्षसच जिंकला आणि तिचे तेच झाले..."
श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणामुळे बेधडक कंगना खूप दुखावली आहे. या प्रकरणाचा तिला खूप राग आला आहे. पोस्ट लिहित तिने श्रद्धाची मानसिक स्थिती समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. कंगनाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
कंगनाचे आगामी सिनेमे -
कंगना रनौतचा 'इमर्जन्सी' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात ती इंदिरा गांधीच्या भूमिकेत दिसणार असून या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरादेखील ती सांभाळणार आहे. लवकरच तिचा 'तेजस' हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. तसेच 'सीता' आणि 'इमली' या सिनेमातदेखील ती दिसणार आहे. तसेच 'नटी बिनोदिनी' या सिनेमाच्या शूटिंगला ती लवकरच सुरुवात करणार आहे.
संबंधित बातम्या