Kamal Haasan: अभिनेता कमल हसन रुग्णालयात दाखल; चेन्नईमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु
23 नोव्हेंबर रोजी कमल हसन (Kamal Haasan) यांना श्री रामचंद्र मेडिकल सेंटर (SRMC) मध्ये दाखल करण्यात आले.
Kamal Haasan: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते कमल हसन (Kamal Haasan) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 23 नोव्हेंबर रोजी त्यांना श्री रामचंद्र मेडिकल सेंटर (SRMC) मध्ये दाखल करण्यात आले. एका कार्यक्रमासाठी कमल हसन हे हैदराबाद (Hyderabad) येथे गेले होते. तेथून चेन्नईला परतल्यानंतर कमल हसन यांना अस्वस्थ वाटत होते. त्यामुळे त्यांना चेक-अपसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या कमल हसन यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
बुधवारी (23 नोव्हेंबर) दुपारी चेन्नईमधील एका खाजगी रुग्णालयात कमल हसन यांना दाखल करण्यात आलं. सध्या डॉक्टरांनी कमल हसन यांना आराम करायचा सल्ला दिला आहे. त्यांना आज (गुरुवार) दुपारी कमल हसन यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे, असंही म्हटलं जात आहे.
अभिनेता कमल हासन हे सध्या शंकरच्या 'इंडियन 2' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये तसेच हिट रिअॅलिटी शो 'बिग बॉस तमिळ' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. अलीकडेच कमल हसन यांनी हैदराबादमध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक के विश्वनाथ यांची भेट घेतली. तसेच कमल हसन हे मणिरत्नम यांच्या आगामी चित्रपटामधून देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. हा चित्रपट 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे, असं म्हटलं जात आहे.
View this post on Instagram
काही महिन्यांपूर्वी रिलीज झालेल्या विक्रम या कमल हसन यांच्या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. 'एक दुजे के लिए' या सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. 'सागर', 'गिरफ्तार', 'जरा सी जिंदगी', 'राज तिलक', 'एक नई पहेली', 'चाची 420', 'हे राम' या चित्रपटांमध्ये कमल हसन यांनी काम केलं.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: