![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Amitabh Bachchan: बिग बींच्या वाढदिवसाला चाहत्यांना मिळालं गिफ्ट; Kalki 2898 AD चित्रपटामधील अमिताभ बच्चन यांचा फर्स्ट लूक आऊट
Amitabh Bachchan: कल्कि 2898 AD या चित्रपटातील अमिताभ बच्चन यांच्या लूकचा फोटो कल्कि 2898 AD या चित्रपटाच्या टीमनं सोशल मीडियावर शेअर केला आहे.
![Amitabh Bachchan: बिग बींच्या वाढदिवसाला चाहत्यांना मिळालं गिफ्ट; Kalki 2898 AD चित्रपटामधील अमिताभ बच्चन यांचा फर्स्ट लूक आऊट Kalki 2898 AD team unveils Amitabh Bachchan's look share photo on social media Amitabh Bachchan: बिग बींच्या वाढदिवसाला चाहत्यांना मिळालं गिफ्ट; Kalki 2898 AD चित्रपटामधील अमिताभ बच्चन यांचा फर्स्ट लूक आऊट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/11/44d450790575d14e387436ce1895cc811697027060109259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Amitabh Bachchan: आज अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा वाढदिवस आहे. बिग बी यांच्या वाढदिवसानिमित्त कल्कि 2898 AD (Kalki 2898 AD) या चित्रपटाच्या टीमनं चाहत्यांना खास गिफ्ट दिलं आहे. कल्कि 2898 AD या चित्रपटातील अमिताभ बच्चन यांच्या लूकचा फोटो चित्रपटाच्या टीमनं सोशल मीडियावर शेअर केला आहे.
कल्कि 2898 AD या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये अमिताभ बच्चन हे एका गुहेत उभे असलेले दिसत आहे. त्यांच्यावर सूर्यप्रकाश पडलेला दिसत आहे. अमिताभ बच्चन यांचा चेहरा झाकलेला आहे. फक्त त्यांचे डोळे दिसत आहेत. पोस्टरमध्ये बिग बी हे हातात काठी, कुर्ता, धोतर आणि शाल अशा लूकमध्ये दिसत आहेत.
वैजयंती मूव्हिज या इन्स्टाग्राम पेजवरुन अमिताभ बच्चन यांच्या कल्कि 2898 AD या चित्रपटामधील लूकचा फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोला कॅप्शन देण्यात आलं, "तुमच्या प्रवासाचा भाग होणे आणि तुमच्या महानतेचे साक्षीदार होणे हा सन्मान आहे. बच्चन सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा."
पाहा लूक:
View this post on Instagram
कल्कि 2898 AD या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबतच प्रभास आणि दीपिका पादुकोण हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. तसेच कमल हसन आणि दिशा पटानी हे कलाकार देखील कल्कि 2898 AD या चित्रपटामध्ये महत्वाची भूमिका साकारणार आहेत, असं म्हटलं जात आहे. हा जानेवारी 2024 मध्ये तेलुगू, हिंदी, तमिळ, मल्याळम, कन्नड आणि इंग्रजी भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.या चित्रपटाचे आधी प्रोजेक्ट-के असे नाव होते. पण नंतर या चित्रपटाचे नाव बदलून कल्कि 2898 AD असं ठेवण्यात आलं. या चित्रपटाला संतोष नारायणन यांनी संगीत दिले आहे, तर चित्रपटाची Cinematography जोर्डजे स्टोजिल्जकोविक यांनी केले आहे. तसेच चित्रपटाचे एडिटिंग कोटागिरी वेंकटेश्वर राव यांनी केले आहे.
कल्कि 2898 AD या चित्रपटासोबत अमिताभ बच्चन यांचे आणखी काही आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. गणपत,सेक्शन 84 आणि तेरा यार हूँ मैं या अमिताभ बच्चन यांच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)