एक्स्प्लोर
दिग्दर्शकाचा काजल अग्रवालला जबरदस्तीने किस, व्हिडीओ व्हायरल
भर कार्यक्रमात काजल अग्रवालला तिचा सहकलाकार आणि दिग्दर्शकाने अचानक किस केल्यामुळे ती दचकली होती.

हैदराबाद : सेलिब्रिटींना अनेकदा विचित्र प्रसंगाना सामोरे जाव लागते. अशाच एका प्रसंगाला दाक्षिणात्य अभिनेत्री काजल अग्रवालला सामोरे जावे लागले. हैदराबाद येथे एका चित्रपटाच्या टीझर लाँचिंगच्या कार्यक्रमात काजल चित्रपटाच्या टीमचे आभार मानत होती. क्रू आणि मेंबर्स यांचे आभार मानत असताना तिने तिचा सहकलाकार आणि दिग्दर्शक छोटा नायडू याचे नाव घेतले. त्यावेळी नायडू पुढे आला व त्याने अचानक काजलला किस केले. त्यानंतर काजल क्षणभरासाठी दचकली होती.
परंतु या प्रकारानंतर काजलने वातावरण गमतीदार पद्धतीने हाताळले. तिने या गोष्टीकडे दूर्लक्ष केले. काजल छोटेला म्हणाली की, 'तुम्ही तर लगेच चान्स मारलात!' यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
'कवचम' नावाचा काजलचा नवा तेलुगू चित्रपट येतोय. या चित्रपटाच्या टीझर लाँचच्या कार्यक्रमात हा प्रकार घडला. श्रीनिवास मल्लिमा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात काजलसोबत बल्लेमकोंडा साई श्रीनिवास आणि मेहरीन परिजादा पहायला मिळतील.
काजलने याआधी बॉलिवूडमध्येदेखील काम केले आहे. अजय देवगनच्या 'सिंघम' चित्रपटात तसेच अक्षय कुमारच्या 'स्पेशल 26' चित्रपटात काजल दिसली होती.View this post on Instagram
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
क्राईम
कोल्हापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
