29 वर्षांनी लहान तरुणीवर अभिनेत्याचं जडलं प्रेम, 70 व्या वर्षी केलं चौथं लग्न; 'या' हँडसम हंक व्हिलेनबद्दल जाणून घ्या...
Kabir Bedi Happy Birthday : अभिनेता किरण बेदी यांनी वयाच्या 70 व्या वर्षी चौथं लग्न केलं होतं. त्यांची पर्सनल लाईफ कायमच चर्चेत राहिली.
Kabir Bedi Birthday : बॉलिवूड चित्रपटांमधील हिरोप्रमाणेच त्यातील व्हिलनचीही चर्चा असते. बॉलिवूड चित्रपट कधी अभिनेत्यामुळे, कधी अभिनेत्रीमुळे तर कधी खलनायकामुळे चर्चेत राहतात. आम्ही आज तुम्हाला अशाच एका व्हिलनची कहाणी सांगणार आहोत, हा व्हिलन अभिनेत्यापेक्षाही हँडसम आहे. हा अभिनेता किरण बेदी आहे. अभिनेता कबीर बेदी यांचा आज 16 जानेवारी रोजी वाढदिवस आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींच्या पर्सनल लाईफची कायमच चर्चा असते. किरण बेदी त्यातीलच एक किरण बेदी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची कहाणी जाणून घ्या.
29 वर्षांनी लहान तरुणीवर जडलं प्रेम
अभिनेता कबीर बेदी यांचा जन्म 16 जानेवारी 1946 रोजी एका शीख कुटुंबात झाला. त्याचे वडील एक लेखक होते आणि आई ब्रिटिश महिला होती. सुरुवातीचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांना थिएटरची आवड निर्माण झाली. यानंतर त्यांचा अभिनय क्षेत्रातील प्रवास सुरु झाला. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी भारदस्त आवाजाच्या जोरावर वेगळी ओळख मिळवली. त्यांच्या आवाजच त्यांची ओळख बनला. चाहते फक्त त्यांच्या आवाजावरुनही त्यांना सहज ओळखायचे.
70 व्या वर्षी केलं चौथं लग्न
किरण बेदी यांनी फक्त बॉलिवूडमध्येच नाही, तर हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची जादू पसरवली आहे. अभिनेता कबीर बेदी जेम्स बाँड सीरिजमधील 13 वा चित्रपट 'ऑक्टोपसी' मध्येही झळकले आहेत. त्यांनी या चित्रपटात त्याने एका बॉडीगार्डची भूमिका साकारली होती. या चित्रपटात रॉजर मूरने जेम्स बाँडच्या भूमिकेत होता.
इटालियन सीरीजने खळबळ
कबीर बेदी यांनी इटालियन मिनी सीरिज संदोकनने चाहत्यांना आश्चर्यचकित केलं आहे. या मालिकेत त्याने एका भारतीय चाच्याची भूमिका साकारली होती. यामुळे त्याला जागतिक पातळीवर ओळख मिळाली. कबीर बेदी यांचं इटलीशी खूप खास नातं आहे, त्यांना इटलीमध्ये ऑर्डर ऑफ मेरिट पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
वादग्रस्त वैयक्तिक आयुष्य
कबीर बेदी हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहिले आहेत. कबीर बेदी चार वेळा प्रेमात पडले आणि त्यांनी चार वेळा लग्न केलं आहे. कबीर बेदी यांनी वयाच्या 70 व्या वर्षी चौथं लग्न केलं. कबीर बेदी यांनी 70 व्या वाढदिवशी प्रेयसी परवीन दोसांझशी चौथं लग्न केलं. कबीर बेदी आणि परवीन दोसांझ हे सुमारे 10 वर्षे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर त्यांनी त्यांच्या नात्याला एक नवीन नाव दिलं.
View this post on Instagram
महत्त्वाच्या इतर बातम्या :