सैफवर जीवघेणा हल्ला, मुंबई पोलिसांची 7 पथकं सक्रिय, एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक घटनास्थळी
Saif Ali Khan Attacked : सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला झाला असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Saif Ali Khan Stabbed : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणाचा तपास आता क्राईम ब्रांचकडे देण्यात आला आहे. क्राईम ब्रांच अधिकारी सैफ अली खानच्या घरी दाखल झाले आहेत. सैफच्या वांद्रे येथील राहत्या घरी त्याच्यावर चोरट्याने हल्ला केला होता, यानंतर गंभीर जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यानंतर आता या प्रकरणाचा तपास वेगाने सुरु आहे. गुन्हे शाखेचे अधिकारी आता घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्याकडून कसून तपास करण्यात येत आहे.
सैफ अली खान हल्ला प्रकरणाचा तपास क्राईम ब्राँचकडे
प्राथमिक माहितीनुसार, सैफ अली खानच्या राहत्या घरी मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास चोर शिरला. ही बाब चोरांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला. यानंतर सैफची चोरासोबत झटापट झाली. यावेळी चोराने सैफवर धारदार शस्त्राने वार केला.
अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर बुधवारी रात्री उशिरा त्याच्या राहत्या घरात चाकू हल्ला झाला. यानंतर त्याला मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. चाकू हल्ल्यात सैफच्या हाताला, पाठीच्या कण्याला आणि मानेला दुखापत झाली. सैफ अली खानचा पाठीला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. तयांची पत्नी करीना कपूर खान त्याच्यासोबत रुग्णालयात उपस्थित आहे.
View this post on Instagram
नेमकं काय घडलं?
अभिनेता सैफ अली खानवर चोराने जीवघेणा हल्ला केला, त्यावेळी त्याच्या मुलांची नॅनीही जखमी झाली आहे. हायप्रोफाईल इमारतीच्या सुरक्षेत एवढी मोठी चूक झाली कशी असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. दरम्यान, पोलिसांनी सैफ अली खानच्या घरात काम करणाऱ्या तीन जणांना ताब्यात घेतलं आहे. तिघांना ताब्यात घेतल्यानंतर, पोलिसांनी त्यांना पोलिस ठाण्यात नेल असून त्यांची चौकशी केली जाईल. पोलिसांनी या कर्मचाऱ्यांचे फोनही ताब्यात घेतले आहेत.
View this post on Instagram
महत्त्वाच्या इतर बातम्या :