एक्स्प्लोर
आता रजनीकांतचा 'कबाली'ही प्रदर्शनापूर्वीच लीक !
मुंबई : प्रदर्शनाआधीच सिनेमा लीक होण्याचं ग्रहण अभिनेता रजनीकांतला लागलं आहे. कारण बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित कबाली हा सिनेमाही ऑनलाईन लीक झाला आहे.
कबाली रिलीज होण्यासाठी अजून तीन दिवस बाकी आहे. येत्या 22 जुलैला हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. मात्र त्यापूर्वीच हा सिनेमा विविध वेबसाईट्सवर उपलब्ध असल्याचं सांगण्यात येत आहे.
याप्रकरणी कबाली टीमने तातडीने संबंधित वेबसाईट्सशी संपर्क करुन, सिनेमा हटवण्याची मागणी केली आहे.
यापूर्वी ग्रेट ग्रॅण्ड मस्ती, सुलतान, मांझी, सैराट यासारखे सिनेमे लीक झाले होते. त्यात आता कबालीचाही समावेश झाला आहे.
दरम्यान, कबाली सिनेमा भारतासह जगभरातील 5 हजार स्क्रीन्सवर दाखवला जाणार आहे. विशेष म्हणजे कबाली सिनेमाच्या रुपाने पहिल्यांदाच एखादा भारतीय सिनेमा जगभरातील 5 हजार स्क्रीन्सवर दाखवला जाणार आहे.
मलेशिया, चीन आणि थायलंड देशांच्या भाषेतही सिनेमा डब करण्यात आला असून, 22 जुलै रोजी सिनेमा रिलीज होणार आहे. अमेरिकेमध्ये ‘कबाली’ 500 स्क्रीन्सवर प्रदर्शित करण्यात येणार आहे.
या सिनेमात रजनीकांत डॉन कबालीश्वरनच्या भूमिकेत असून, मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटेही मुख्य भूमिकेत आहे. तैवानचा सुपरस्टार विनस्टॉन चाओ याने सिनेमात खलनायकाची भूमिका साकारली आहे.
संबंधित बातम्या
व्हॉट्सअॅपवरील रजनीकांत यांच्या ‘कबाली’च्या ‘इमोजीचं व्हायरल सत्य
इरफान म्हणतो, रजनीकांतने पोस्टरची कल्पना चोरली, पण..
घरात टॉयलेट बांधा, 'कबाली'चं तिकीट मोफत मिळवा 'एअर एशिया'चं रजनीप्रेम, विमानावर थलैवाचा फोटो रजनी फिव्हर.... ‘कबाली’ची रिलीज आधीच 200 कोटींची कमाई!अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्राईम
राजकारण
Advertisement