एक्स्प्लोर

Jui Gadkari : इर्शाळवाडीतील दुर्घटनाग्रस्तांच्या मदतीला धावली जुई गडकरी; पोस्ट शेअर करत चाहत्यांनाही केलं आवाहन

Jui Gadkari : अभिनेत्री जुई गडकरीने इर्शाळवाडीतील दुर्घटनाग्रस्तांसाठी मोठी मदत केली आहे.

Jui Gadkari On Irshalwadi : मुसळधार पावसामुळे राजगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीवर (Irshalwadi) दरड कोसळली असून यात अनेकांना जीव गमवाला लागला. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना वाचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अनेक लोक गावकऱ्यांना मदत करत आहे. दरम्यान मराठमोळी अभिनेत्री जुई गडकरीदेखील (Jui Gadkari) मदतीसाठी पुढे सरसावली आहे. 

जुई गडकरीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांनाही दुर्घटनाग्रस्तांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे. तिने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत लिहिलं आहे,"इर्शाळवाडीसाठी मदत पाठवायची असल्यास कृपया मला मेसेज करा.. पंचे, चादरी, औषधे, कपडे, चपला, जेवण, ई जीवनावश्यक वस्तु तिथपर्यंत माझ्या टीमकडून पोहचवल्या जातील". 

Jui Gadkari : इर्शाळवाडीतील दुर्घटनाग्रस्तांच्या मदतीला धावली जुई गडकरी; पोस्ट शेअर करत चाहत्यांनाही केलं आवाहन

जुईने इर्शाळवाडीतील लोकांसाठी मदतीला हात पुढे केल्याने चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचं कौतुक करत आहेत. तसेच चाहत्यांनी तिला मदतीचं आश्वासन दिलं आहे. जुई आणि इर्शाळवाडीचं एक वेगळचं नातं होतं. दुर्घटनेनंतर खास पोस्ट शेअर करत तिने हळहळ व्यक्त केली होती.

जुई गडकरीची पोस्ट काय? (Jui Gadkari Post)

जुईने लिहिलं होतं,"इर्शाळवाडीवर गेलो तेव्हाच्या काही आठवणी...सकाळपासून इर्शाळवाडीवर दरड कोसळल्याची बातमी बघतेय आणि डोकं सुन्नं झालय… तिथल्या आऊच्या हातचा स्वयंपाक अजुनही आठवतोय… एवढ्या ऊंचावर असलेली ठाकरवाडी… विज नाही.. मेडीकल, जिवनावश्यक वस्तु असं वरती ठकरवाडीत काहीच नाही.. तरीही सदैव चेहरा हसरा… कसं काय जमतं त्यांना? प्रत्येक वेळेला 1-1.30 तास चढुन वर जाणं किती अवघड आहे… पण तरीही कसलीही तक्रार न करता खुप कष्ट करुन मानाने जगतात ही ठाकरं… माझ्या खूप जवळचा विषय आहे ठाकरं आणि ठाकरवाड्या… कितीतरी वाड्यांवर मी फिरलिये… त्यांच्या हातचं चविष्ठं जेवण केलं आहे… या बातमीने खूप वाईट वाटलं… सगळे सुखरुप असुदेत..".

इर्शाळवाडी परिसरात पर्यटक, नागरिकांना बंदी 

इर्शाळवाडी परिसरात पर्यटक, नागरिकांना प्रवेश बंदी लागू करण्यात आली आहे.  नैसर्गिक आपत्तीमुळे दरड कोसळलेल्या घटनास्थळांचे ठिकाणी आणि त्याच्या परिसरात इर्शाळगड, नंबराची वाडी येथील दुर्घटनास्थळी, बेस कॅम्प परिसरात शासकीय मदत यंत्रणा तसेच मदतकार्यात नेमणूक केलेल्या इतर व्यक्ती, सेवाभावी संस्था यांच्या व्यतिरिक्त इतर नागरिक, पर्यटक व ट्रेकर्स यांना प्रवेशास निर्बंध करण्यात आला आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) नुसार दिनांक 23 जुलै ते दिनांक 6 ऑगस्ट या कालावधीसाठी प्रतिबंधात्मक आदेश उपविभागीय दंडाधिकारी कर्जत अजित नैराळे यांनी लागू केले आहेत.

संबंधित बातम्या

Jui Gadkari: 'डोकं सुन्न झालंय,सगळे सुखरुप असुदेत...'; इर्शाळवाडी दुर्घटनेबाबत अभिनेत्री जुई गडकरीची पोस्ट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget