Johny Lever on Shah Rukh Khan: शाहरुखपेक्षा मी जास्त लोकप्रिय होतो, आज त्याच्याकडे जे काही आहे... जॉनी लिव्हर यांचं मोठं वक्तव्य
Johny Lever on Shah Rukh Khan: जॉनी लिव्हर यांनी एका मुलाखती दरम्यान म्हटलं की, जेव्हा 'बाजीगर' हा चित्रपट आला तेव्हा लोक मला जास्त ओळखत होते. शाहरुखने जे काही कमावलं आहे, ते स्वत:च्या जीवावर कमावलं आहे.
Johny Lever on Shah Rukh Khan: बॉलीवूडचा किंग खान अर्थातच शाहरुख खानबाबत (Shah Rukh Khan) नुकतच विनोदवीर आणि अभिनेते जॉनी लिव्हर (Johny Lever) यांनी वक्तव्य केलं आहे. तसेच एकेकाळी शाहरुखपेक्षा मी जास्त प्रसिद्ध होतो, असं देखील यावेळी जॉनी लिव्हर यांनी म्हटलं. नुकतच जॉनी लिव्हर यांनी युट्युबर रणवीर एलाहाबादियाला दिलेल्या एका मुलाखतीमद्ये शाहरुख आणि त्याच्याशी संबंधित अनेक गोष्टींवर भाष्य केलं आहे.
शाहरुख खानच्या व्यक्तिमत्वार भाष्य करत जॉनी लिव्हर यांनी म्हटलं की, आज शाहरुखकडे जे काही आहे ते त्याने मेहनत करुन कमावलं आहे. तसेच त्यांनी शाहरुखविषयी अनेक गोष्टींवर भाष्य करत त्याचे कौतुक देखील केले आहे.
मी शाहरुखपेक्षा जास्त लोकप्रिय होतो - जॉनी लिव्हर
या मुलाखतीदरम्यान जॉनी लिव्हर यांनी म्हटलं की, 1993 मध्ये जेव्हा बाजीगर हा चित्रपट आला होता, तेव्हा मी शाहरुखपेक्षा जास्त लोकप्रिय होतो. 'बाजीगर' आधी शाहरुख राजू बन गया जेंटलमेन सारख्या चित्रपटांमध्ये पाहायला मिळाला होता. पण त्यावेळी मी शाहरुखपेक्षा जास्त लोकांना माहित होतो. जेव्हा बाजीगर बनत होता, तेव्हाही लोकं मला शाहरुखपेक्षा जास्त ओळखत होते. तेव्हा मी स्टार होतो आणि शाहरुख वर येत होता. पण तरीही सेटवर आमची तितकीच चांगली मैत्री होती.
मी शाहरुख एवढा मेहनती अजून नाही पाहिला - जॉनी लिव्हर
शाहरुख खानसारखा मेहनती माणूस मी कधीच पाहिला नाही. काळात शाहरुखला डान्स आणि ॲक्शन सीन करण्यात अडचणी येत होत्या. असे असूनही त्यांनी ते आव्हान म्हणून स्वीकारले आणि स्वत:मध्ये सुधारणा केली. शाहरुख खानने स्वतःला सुधारण्यासाठी खूप मेहनत घेतली आणि कालांतराने त्याला त्या मेहनतीचे फळ मिळाले. आज तो ॲक्शन आणि डान्स दोन्ही उत्तम करतो, हे त्याच्या मेहनतीमुळेच आहे, असंही जॉनी लिव्हर यांनी म्हटलं.
शाहरुखच्या मुलींच्या रांगा - जॉनी लिव्हर
शाहरुखची पर्सनॅलिटी अशी आहे की, मुली लगेच अॅट्रॅक्ट होतात, असं देखील जॉनी यांनी यावेळी म्हटलं. 'येस बॉस' या चित्रपटातील एक प्रसंग देखील यावेळी जॉनी लिव्हर यांनी सांगितला. त्यांनी म्हटलं की, लंडनमध्ये चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान शाहरुखला पाहून मुली ज्या पद्धतीने वेड्या झाल्या, त्या मुलींसोबत असलेल्या मुलांनी रागाच्या भरात शाहरुखवर वस्तू फेकण्यास सुरुवात केली.