Jaya Bachchan On Amitabh Bachchan Rekha : बिंग बींना रेखाजींसोबत एकत्र काम करू देणार? जया बच्चन म्हणाल्या, "जर दोघांनी एकत्र..."
Jaya Bachchan On Amitabh Bachchan Rekha : अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या रिलेशनशीपच्या अफवा उठू लागल्या. या अफवांमुळे, अमिताभ बच्चन आणि रेखा यांनी 1981 नंतर कोणत्याही चित्रपटात एकत्र काम केले नाही.
![Jaya Bachchan On Amitabh Bachchan Rekha : बिंग बींना रेखाजींसोबत एकत्र काम करू देणार? जया बच्चन म्हणाल्या, Jaya Bachchan On Amitabh Bachchan Rekha Will Jaya Bachchan Allow Amitabh Bachchan to Work with Rekha know about Jaya Bachchan Answer Jaya Bachchan On Amitabh Bachchan Rekha : बिंग बींना रेखाजींसोबत एकत्र काम करू देणार? जया बच्चन म्हणाल्या,](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/06/0e9e76ecabbfe8b3bb97cacc9480e0ca1717665833085290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Jaya Bachchan On Amitabh Bachchan Rekha : बॉलिवूडमध्ये अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), जया बच्चन (Jaya Bachchan) आणि रेखा (Rekha) हे दिग्गज कलाकारांपैकी एक आहेत. सिनेइंडस्ट्रीत या तिघांबद्दल प्रचंड प्रेम, आदराची भावना आहे. या तिघांनी सिनेइंडस्ट्रीवर 70-80 च्या दशकात अधिराज्य गाजवले. मात्र, अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या रिलेशनशीपच्या अफवा उठू लागल्या. या अफवांमुळे, अमिताभ बच्चन आणि रेखा यांनी 1981 नंतर कोणत्याही चित्रपटात एकत्र काम केले नाही.
अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या कथित अफेअरच्या चर्चादेखील अनेकदा सुरू असतात. जया बच्चन यांना 2008 मध्ये एका मुलाखतीत रेखा आणि अमिताभ बच्चन एकत्र काम केल्यास त्यावर तुम्हाला आक्षेप आहे का, यावर जया बच्चन यांनी उत्तर दिले.
View this post on Instagram
जया बच्चन यांनी काय उत्तर दिले?
एका मुलाखतीत जया बच्चन यांना हा प्रश्न विचारण्यात आला होता. 'रेडिट' या वेबसाईटवर असलेल्या व्हिडीओनुसार, जया बच्चन यांनी उत्तर देताना म्हटले की, अमिताभ आणि रेखा यांनी जर एकत्र काम केले तर मला हरकत असण्याचे कारण काय? मात्र, दोघांनी एकत्र काम केल्यास त्यावरून एकच उलटसुलट चर्चा सुरू होतील. हे अतिशय दु:खद असून दोघांना एकत्र काम करण्याची संधी त्यांचे चाहते गमावतील. कामापेक्षा इतर गोष्टींची चर्चा अधिक होईल, याची जाणीव या दोघांनाही झाली होती असेही जया बच्चन यांनी म्हटले.
रेखा-अमिताभ जोडीचा शेवटचा चित्रपट...
सिलसिला या चित्रपटानंतर रेखा आणि जया बच्चन यांनी पुन्हा एकत्रपणे काम केले नाही. इतकंच नाही तर रेखा आणि अमिताभ बच्चन यांनीदेखील एकत्र काम केले नाही. अमिताभ आणि जया यांची जोडी ही सिनेइंडस्ट्रीमधील सर्वात मजबूत जोडी आहे. अमिताभ-जया यांनी 1973 मध्ये विवाह केला होता. तेव्हापासून दोघांचे वैवाहिक आयुष्य सुरळीतपणे सुरू आहे. लग्नाच्या जवळपास 51 वर्षानंतरही दोघांमधील बंध घट्ट असल्याचे दिसून येते. नात नाव्या नंदाच्या पॉडकास्टमध्ये बोलताना जया बच्चन यांनी सांगितले होते की, अमिताभ बच्चन हे त्यांचे बेस्ट फ्रेंड असून त्यांच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर करतात.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)