ऐश्वर्या-अभिषेकच्या घटस्फोटाची चर्चा, अभिनेत्रीच्या जवळच्या मित्राचं नाव चर्चेत; कोण आहे जिरक?
Abhishek Bachchan-Aishwarya Rai Divorce : ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्यात दुरावा आल्याचं सांगितलं जात असून त्यांचा घटस्फोट होण्याची चर्चा रंगली आहे.

मुंबई : अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) आणि अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांच्या लव्हस्टोरीमध्ये सध्या सर्व काही आलबेल नसल्याचं सांगितलं जात आहे. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्यात दुरावा आल्याचं सांगितलं जात असून त्यांचा घटस्फोट (Divorce) होण्याची चर्चा रंगली आहे. अभिषेक बच्चनने घटस्फोटासंबंधित एक पोस्ट लाईक केल्यानंतर तो ऐश्वर्याकडून घटस्फोट घेणार असल्याचं बोललं जात आहे. ऐश्वर्या आणि अभिषेक विभक्त (Aishwarya Abhishek Divorce) होणाऱ्या असल्याच्या बातम्या जोर धरु लागल्या आहेत. आता यामध्ये नवीन माहिती समोर आली आहे.
ऐश्वर्या-अभिषेकच्या घटस्फोटाची चर्चा
अभिेषेक बच्चनने अलिकडे एक इंस्टाग्राम पोस्ट लाईक केली होती. अभिषेकने घटस्फोटासंबंधित एक पोस्ट लाईक केली होती. त्यामुळे अभिषेक आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु झाल्या. त्याआधी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नात अभिषेक आणि ऐश्वर्या वेगवेगळे पोहोचले होते. अभिषेक बच्चन कुटुंबासोबत तर ऐश्वर्या मुलगी आराध्यासोबत पार्टीमध्ये पोहोचली होती. या पार्टीत ऐश्वर्या आणि अभिषेकने सोबत एकही फोटो काढला नाही. त्यानंतर अभिषेकने घटस्फोटाची पोस्ट लाईक केल्यावर या दोघांच्या नात्यात दुरावा असल्याचं बोललं जात आहे.
अभिषेक बच्चनकडून घटस्फोटाची पोस्ट लाईक
दरम्यान, आता एका Reddit पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, अभिषेक बच्चनने घटस्फोटाची पोस्ट लाईक करण्यामागचं खरं कारण घटस्फोट नसून काही वेगळंच आहे. अभिषेक बच्चनने घटस्फोटाची ही पोस्ट लाईक करण्याचं कारण आता समोर आलं आहे.
ऐश्वर्याच्या जवळच्या मित्राचं नाव चर्चेत
अभिषेकने पोस्ट लाईक करण्याचं कारण ऐश्वर्याचं आहे, पण त्याचा संबंध घटस्फोटाशी नाही. ऐश्वर्या रायचा जवळचा मित्र जिर्क मार्कर याने घटस्फोटासंदर्भातील हे आर्टिकल लिहिण्यात योगदान दिलं आहे. हे घटस्फोटासंबंधित आर्टिकल आणि पोस्ट पत्नी ऐश्वर्याच्या जवळच्या मित्राने लिहिला असल्याने अभिषेक बच्चनने ती पोस्ट लाईक केली, असं समोर आलं आहे.
ऐश्वर्या रायचा जवळचा मित्र जिरक
जिरक हा ऐश्वर्या रायचा जवळचा मित्र असून तो एक मानसिक आरोग्य विशेषज्ञ आहे. फारुख शेखच्या 'जीना इसी का नाम' या शोमध्ये तो ऐश्वर्या रायसोबत पाहुणा म्हणून आला होता. या शोमध्ये दोघांनीही त्यांच्या मैत्रीबद्दल मोकळेपणाने सांगितलं होतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चनचा ग्रे घटस्फोट होणार? Grey Divorce म्हणजे काय?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
