Janhvi Kapoor : जान्हवी कपूर तिरुपती बालाजीच्या दर्शनाला! पारंपारिक लूकने वेधलं लक्ष
Janhvi Kapoor Video Viral : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले आहे.
Janhvi Kapoor Visits Sri Venkateswara Swami Temple in Tirumala : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) सध्या चर्चेत आहे. अभिनेत्रीने आजवर आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अभिनेत्री सध्या हैदराबादमध्ये तिच्या आगामी 'देवरा' या सिनेमाचं शूटिंग करत आहे. या शूटिंगमधून वेळ काढत ती तिरुपती बालाजीच्या दर्शनाला पोहोचली आहे.
जान्हवी कपूर तिरुपती बालाजीच्या दर्शनाला!
जान्हवी कपूर श्री व्यंकटेश्वर मंदिरात पोहोचली आहे. तिने तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले आहे. दरवर्षी हजारो भाविक या मंदिरात येत असतात. भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक हे मंदिर मानले जाते. जान्हवी कपूर या मंदिरात पारंपारिक पेहरात गेली होती. बिना मेकअप लूक आणि पारंपारिक पेहरावाने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. जान्हवीने तिच्या टीमसोबत तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले आहे.
#WATCH | Andhra Pradesh | Actress Janhvi Kapoor visits Sri Venkateswara Swami Temple in Tirumala to offer prayers. pic.twitter.com/zbOHYkcBfH
— ANI (@ANI) August 28, 2023
आंध्र प्रदेशातील श्री व्यंकटेश्वर मंदिर हे भारतातील सर्वात श्रीमंत मंदिर मानले जाते. तसेच भारतातील सर्वात प्रतिष्ठित मंदिरामध्ये या मंदिराचा समावेश होतो. जान्हवीच नाही तर तिची आईदेखील धार्मिक आहे. जान्हवी कपूर श्री व्यंकटेश्वर मंदिरात आल्याचे चाहत्यांना कळताच त्यांनी मंदिर परिसरात लाडक्या अभिनेत्रीची एक झलक पाहण्यासाठी मोठी गर्दी केली. पण अभिनेत्रीने मात्र चाहत्यांसोबत संवाट साधण्याचं टाळलं.
जान्हवी कपूरचा बालाजी मंदिरातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जान्हवी तिच्या आगामी सिनेमासाठी आशीर्वाद घेण्यासाठी श्री व्यंकटेश्वर मंदिरात आल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. याआधीदेखील जान्हवी कपूर तिरुपती बालाजीच्या दर्शनाला आली होती. त्यावेळीदेखील तिचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते.
जान्हवी कपूरच्या सिनेमांबद्दल जाणून घ्या... (Janhvi kapoor Movies)
नितेश तिवारी (Nitesh Tiwari) दिग्दर्शित 'बवाल' (Bawal) या सिनेमात जान्हवी शेवटची दिसली होती. या सिनेमातील तिच्या कामाचं प्रचंड कौतुक झालं. वाढदिवशी जान्हवीने तिच्या आगामी 'देवारा' (Devara) या सिनेमाची घोषणा केली होती. या सिनेमाच्या माध्यमातून अभिनेत्री दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. 'मिस्टर अॅन्ड मिसेस माही','ओटीटी उलझ','तख्त' आणि 'बडे मिया और छोटे मियां' या सिनेमात ती झळकणार आहे.
संबंधित बातम्या