(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Janhvi Kapoor : जान्हवी कपूरने मुंबईत खरेदी केले आलिशान घर; किंमत ऐकून व्हाल अवाक
Janhvi Kapoor : जान्हवी कपूरने मुंबईतील पाली हिल परिसरात आलिशान घर खरेदी केले आहे.
Janhvi Kapoor : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) सध्या चर्चेत आहे. जान्हवीचा 'मिली' (Mili) हा सिनेमा आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पण जान्हवी आज सिनेमासह एका वेगळ्या कारणाने चर्चेत आहे. जान्हवीने नुकतेच मुंबईत आलिशान घर खरेदी केले आहे.
जान्हवी कपूरने मुंबईत तिचे स्वप्नातील घर खरेदी केले आहे. तिने मुंबईतील पाली हिल परिसरात आलिशान घर खरेदी केले आहे. तिने 65 कोटींची डुप्लेक्स अपार्टमेंट खरेदी केली आहे. जान्हवीचे हे घर खूपच सुंदर असल्याचे म्हटले जात आहे. जान्हवीने खरेदी केलेल्या या आलिशन अपार्टमेंटमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर भला मोठा बगीचा आणि स्विमिंग पूल आहे. तसंच या अपार्टमेंटमध्ये गाड्या पार्किंगसाठी पाच स्लॉट देखील देण्यात आले आहेत.
जान्हवी कपूरने घर खरेदी केलेला पाली हिल परिसर अतिशय महागडा आहे. शाहरुख खान, आमिर खान, सलमान खान, रणवीर सिंग यांच्यासह अनेक सिलिब्रिटी याच परिसरामध्ये राहतात. आता जान्हवीदेखील या सेलिब्रिटींच्या यादीत सहभागी झालेली आहे.
बॉलिवूड स्टार किड्स सध्या चर्चेत आहेत. दिवाळी पार्टी असो किंवा हॅलोवीन पार्टी, बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही तिच्या बोल्ड लूकमुळे कायम चर्चेत असते. सोशल मीडियावरदेखील ती नेहमीच अॅक्टिव्ह असते. नुकताच जान्हवीचा 'मिली' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 2019 साली प्रदर्शित झालेल्या ‘हेलन’ या मल्याळम सिनेमाचा हा रिमेक आहे. मथुकुट्टी झेवियरने 'मिली' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि दिग्दर्शक बोनी कपूर यांची मुलगी म्हणून जान्हवीला ओळखले जात असले तरी ती कायम स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असते. जान्हवी प्रमाणेच अभिनेता रणवीर सिंहनेदेखील वांद्रे परिसरात 119 कोटींचे घर विकत घेतले आहे.
वयाच्या 25 व्या वर्षी घेतलं कोट्यवधी रुपयांचं घर
जान्हवी कपूरने वयाच्या 25 व्या वर्षी कोट्यवधी रुपयांचं घर घेतलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जान्हवीच्या नवीन घराचं क्षेत्रफळ 8 हजार 669 स्क्वेअर फूट आहे. ज्याचं कार्पेट क्षेत्र 6421 चौरस फूट आहे. नव्या प्रॉपर्टीची नोंदणी अभिनेत्रीने 12 ऑक्टॉबर रोजी केली. त्यासाठी अभिनेत्रीने 3.93 कोटी रुपये मोजले.
संबंधित बातम्या