Jammu Film Festival : 'जम्मू फिल्म फेस्टिव्हल'ला आजपासून सुरुवात; 15 देशांतील 54 सिनेमे होणार प्रदर्शित
Film Festival : 'जम्मू फिल्म फेस्टिव्हल'ला आजपासून सुरुवात झाली आहे. या महोत्सवात 54 सिनेमे प्रदर्शित होणार आहेत.
Jammu Film Festival : 'जम्मू फिल्म फेस्टिव्हल'ला (Jammu Film Festival) आजपासून (3 सप्टेंबर) सुरुवात झाली आहे. दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात 15 देशांतील 54 सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. जम्मूत सप्टेंबर 2019 मध्ये पहिल्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं होतं. कोरोनामुळे गेलं दोन वर्ष हा महोत्सव झाला नव्हता. पण यंदा मात्र जल्लोषात महोत्सव पार पडणार आहे.
'जम्मू फिल्म फेस्टिव्हल'चे अध्यक्ष राकेश रोशन भट्ट म्हणाले," जम्मू आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' 3 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. मागील ऑक्टोबर महिन्यापासून या महोत्सवाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. या महोत्सवाला स्पर्धकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. या महोत्सवासाठी 15 देशांतून 140 सिनेमे पाठवण्यात आले होते. यातून 54 सिनेमांची निवड करण्यात आली आहे. 'जम्मू फिल्म फेस्टिव्हल'मध्ये सहा फिचर फिल्म, 39 लघुपट आणि नऊ वृत्तचित्रांची निवड करण्यात आली आहे.
View this post on Instagram
जम्मू आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात संदीप पाठकचा गौरव
अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतून 'राख' सिनेमातील भूमिकेसाठी अभिनेते संदीप पाठक यांना गौरविण्यात आले आहे. आता जम्मू आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही संदीप पाठकने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावत आपल्या यशाची मालिका सुरुच ठेवली आहे. 15 देशांचे 54 सिनेमे या आंतरराष्ट्रीय महोत्सवासाठी निवडण्यात आले होते.
जम्मू आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासंदर्भात संदीप म्हणाला,"आपण केलेल्या कष्टाला जेव्हा कौतुकाची थाप मिळते. तो क्षण भाग्याचा असतो. हा पुरस्कार मला मिळाला असला तरी आमच्या संपूर्ण टीमचे हे श्रेय आहे. एक वेगळी कलाकृती सादर करण्याचा आमच्या टीमचा हा प्रयत्न यशस्वी झाला असून विविध महोत्सवांमध्ये घेतली जाणारी ‘राख’ सिनेमाची दखल आम्हाला सुखावणारी आहे".
संबंधित बातम्या