Jackie Chan : जगातील सर्वात श्रीमंत अभिनेता जॅकी चॅन! लेक मात्र बेघर
Jackie Chan : जॅकी चॅन आज सर्वाधिक श्रीमंत अभिनेता असला तरी त्याची लेक मात्र बेघर आहे.

Jackie Chan : अभिनेता जॅकी चॅनची (Jackie Chan) गणना जगभरातील सर्वाधिक श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत केली जाते. जॅकी तब्बल 520 मिलियन डॉलरच्या संपत्तीचा मालक आहे. जगभरात त्याचे चाहते आहेत. पण तरीही त्याच्या मुलीकडे राहायला घर नाही आहे.
जॅकी चॅन अभिनेता असण्यासोबत मार्शल आर्टिस्ट, स्टंटमॅन, सिने-दिग्दर्शक, कोरियोग्राफर, लेखक, निर्माता आणि गायक आहे. मेहनतीच्या जोरावर त्याने स्वत:ला सिद्ध केलं आहे. चाहते नेहमीच त्याचा आदर करतात. पण विवाहबाह्य संबंधामुळे त्याला प्रडंड ट्रोल करण्यात येते. या संबंधातून त्याला एक मुलगी झाली आहे. या मुलीचं नाव एटा एनजी असं आहे.
जॅकीचं जोआन लिनसोबत लग्न झालं आहे. जॅकी आणि लिनच्या मुलाचं नाव जेसी चॅन असं आहे. जॅकीचे दोन्ही मुलं वेगवेगळ्या वातावरणात लहानाची मोठी झाली आहेत. जॅकीचा मुलगा खूप चांगली जीवनशैली जगत आहे. तर दुसरीकडे त्याच्या लेकीला मात्र अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
जोआन लिन प्रेग्नंट असल्याचं जॅकीला कळल्यानंतर त्याने ते नातं तोडलं. त्यामुळे एटाच्या जन्मानंतर तिला वडिलांचं प्रेम कधी मिळालंच नाही. एका मुलाखतीत जोआन म्हणाली होती,"जॅकीच्या संपत्तीची एटाला गरज नाही". पण गेल्या काही दिवसांपूर्वी एटाने एक व्हिडीओ शेअर केला. व्हिडीओमध्ये ती म्हणाली,"विवाहबाह्य संबंधामुळे आज मी बेघर आहे".
View this post on Instagram
जॅकी 2015 साली एका मुलाखतीत म्हणाला होता,"मला असं वाटतं की एटाला माझ्या संपत्तीची काहीही गरज नाही. काही गोष्टींबद्दल न बोलणंच योग्य असतं. पण एटाला जर कधी माझी गरज असेल तर मी नक्कीच तिला मदत करेन".
संबंधित बातम्या























