एक्स्प्लोर
इलियाना डी क्रूझचं बॉयफ्रेण्डसोबत गुपचूप लग्न?
2017 मध्ये इलियानाचे 'मुबारकां' आणि 'बादशाहो' हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले होते. दोन्ही चित्रपटांमधील इलियानाच्या अभिनयाची फार स्तुती झाली होती.
![इलियाना डी क्रूझचं बॉयफ्रेण्डसोबत गुपचूप लग्न? Is Ileana D’Cruz secretly married to boyfriend Andrew Kneebone? इलियाना डी क्रूझचं बॉयफ्रेण्डसोबत गुपचूप लग्न?](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/05/27193736/Ileana-DCruz.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीनंतर आणखी एका बॉलिवूड अभिनेत्रीने गुपचूप लग्न केल्याची चर्चा आहे. इलियाना डी क्रूझ परदेशी बॉयफ्रेण्ड अँड्र्यू नीबोनसोबत विवाहबद्ध झाल्याचं म्हटलं जात आहे.
इलियाना डी क्रूझच्या एका इन्स्टाग्राम फोटोच्या कॅप्शनवरुन तिने लग्न केल्याचा अंदाज लावला जात आहे. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ह्या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने बॉयफ्रेण्डचा उल्लेख 'हबी' अर्थात नवरा असा केल्याने तिने लग्न केल्याची चर्चा आहे.
ख्रिसमसला इलियानाने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. त्याच्या कॅप्शनमध्ये तिने 'हबी' असा उल्लेख केला होता. "माझ्यासाठी ख्रिसमसचा काळ हा वर्षातील सर्वात आवडता काळ असतो. हॅप्पी हॉलिडेज, फोटो बाय हबी," असं कॅप्शन तिने फोटोला दिलं आहे.
2017 मध्ये इलियानाचे 'मुबारकां' आणि 'बादशाहो' हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले होते. दोन्ही चित्रपटांमधील इलियानाच्या अभिनयाची फार स्तुती झाली होती. दरम्यान, इलियानाने तिच्या लग्नाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. इलियाना अनेक वर्षांपासून ऑस्ट्रेलियन फोटोग्राफर अँड्र्यूला डेट करत आहे. दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असल्याचं कळतं. इन्स्टाग्रामवर एलियाना अँड्र्यूसोबतचे फोटो सातत्याने शेअर करत असते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
बीड
करमणूक
लाईफस्टाईल
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)