![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Irrfan Khan Death Anniversary : कधी रोमॅंटिक हिरो तर कधी डाकू; जाणून घ्या इरफान खान यांच्या लक्षवेधी भूमिकांबद्दल...
Irrfan Khan : इरफान खान यांनी आपल्या अभिनयाने सर्वांना वेड लावलं आहे. त्याने साकारलेल्या अनेक भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत.
![Irrfan Khan Death Anniversary : कधी रोमॅंटिक हिरो तर कधी डाकू; जाणून घ्या इरफान खान यांच्या लक्षवेधी भूमिकांबद्दल... Irrfan Khan Death Anniversary irrfan khan popular movies irrfan khan best performances movies Irrfan Khan Death Anniversary : कधी रोमॅंटिक हिरो तर कधी डाकू; जाणून घ्या इरफान खान यांच्या लक्षवेधी भूमिकांबद्दल...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/29/bc02c176f1caa3246f35b38417eafc321682741017473254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Irrfan Khan : दिवंगत अभिनेते इरफान खान (Irrafan Khan) यांची आज तिसरी पुण्यतिथी आहे. इरफान खान यांनी आपल्या अभिनयाने सर्वांना वेड लावलं आहे. त्यांनी साकारलेल्या अनेक भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहे. एनएसडी ते हॉलिवूडपर्यंत इरफान खान यांचा बोलबाला पाहायला मिळला आहे. इरफान आज हयात नसले तरी त्यांच्या भूमिकांच्या माध्यमातून ते आजही चाहत्यांच्या मनात जिवंत आहे. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या सर्वोत्कृष्ट भूमिकांबद्दल जाणून घ्या...
मकबूल : इरफान खान यांचा 'मकबूल' हा सिनेमा 2003 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात त्यांनी मकबूचली भूमिका साकारली होती. मकबूल हा अंडरवर्ल्ड डॉन अब्बाजीचा विश्वासू माणूस दाखवण्यात आला होता. मकबूलच्या पात्रातील वेगवेगळ्या बाजू इरफान यांनी खूपच चांगल्या पद्धतीने मांडली.
पान सिंह तोमर : 'पान सिंह तोमर' हा सिनेमा 2012 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात इरफान पान सिंह तोमरच्या भूमिकेत दिसले. या सिनेमातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
लंच बॉक्स : इरफानचा 'लंच बॉक्स' हा सिनेमा 2013 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात अभिनेते सज्जन फर्नांडिसच्या भूमिकेत दिसून आले. कान्स फिल्म फेस्टिव्हलसह अनेक पुरस्कार सोहळ्यांत या सिनेमाने बाजी मारली आहे. हा रोमॅंटिक सिनेमा आणि इरफान यांची भूमिका चाहत्यांच्या पसंतीस उतरली होती.
मदारी : 'मदारी' हा सिनेमा 2016 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. निशिकांत कामत दिग्दर्शित या सिनेमात इरफान यांनी मदारीची भूमिका साकारली होती. त्याच्या पात्राचे नाव निर्मल कुमार असे होते. सिनेमात समाजातील काही गोष्टींना धडा शिकवताना निर्मल गृहमंत्र्यांच्या मुलाचे अपहरण करताना दिसतो.
लाइफ ऑफ पाई : 'लाइफ ऑफ पाई' हा सिनेमा 2012 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाच्या माध्यमातून इरफान यांना हॉलिवूडमध्ये ओळख मिळाली. ऑंग लीने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमात इरफान यांनी पाईची भूमिका साकारली होती.
हरहुन्नरी अभिनेते इरफान खान!
इरफान खान हरहुन्नरी अभिनेते होते. 'ज्युरासिक पार्क', 'अंग्रेजी मीडियम', 'हिंदी मीडियम', 'लाइफ ऑफ पाय' सारखे संस्मरणीय चित्रपट देणाऱ्या इरफान खान यांनी 29 एप्रिल 2020 रोजी न्यूरोएंडोक्राइन ट्यूमरशी संघर्ष करता करता या जगाचा निरोप घेतला.
संबंधित बातम्या
Irrfan Khan : "इरफानच्या निधनानंतर 45 दिवस स्वत:ला कोंडून घेतलेलं एका खोलीत"; वडिलांच्या निधनानंतर मुलाची 'अशी' झालेली अवस्था
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)