एक्स्प्लोर

4 चेंडूत 20 धावा, धोनीचा षटकार बघून नेहा धुपियाने तोंडात बोटं घातली, करिना आणि सारा तेंडुलकर जागच्या जागी बसून राहिली!

IPL 2024 MI vs CSK : आयपीएल सामन्यातील मुंबई विरुद्ध चेन्नईच्या सामन्यात धोनीच्या बॅटींगमुळे पुन्हा एकदा चाहत्यांची मनं जिंकलीत.

IPL 2024 MI vs CSK : आयपीएलच्या (IPL 2024) हंगामात बहुप्रतिक्षित असलेला मुंबई (Mumbai Indians) आणि चेन्नईचा (Chennai Super Kings) सामना आज वानखेडेच्या मैदानावर खेळवण्यात आला. नेहमीप्रमाणेच यंदाही वानखेडेचं मैदान धोनीच्या बॅटींगनं गाजलं. चार चेंडू शिल्लक असताना धोनी मैदानात आला. धोनी मैदानात येताच चाहत्यांनी एकच जल्लोष केला. अवघ्या चार चेंडून 20 धावा करत धोनीने वानखेडेच्या मैदावर धावांचा पाऊस पाडला. दरम्यान यावेळी मैदानावर मुंबईच्या सपोर्टला आलेल्या बॉलीवूडकरांनाही शांत बसावं लागलं. 

हार्दीक पांड्याच्या चेंडूवर धोनीने षटकांचा पाऊस पाडला. पहिल्या तीन चेंडूतच धोनीने तीन षटकार मारत वानखेडेच्या मैदानावर एकच वातावरण तयार केलं. यावेळी मुंबईच्या सपोर्टसाठी आलेल्या चाहत्यांच्या पदरात मात्र काहीश्या प्रमाणात निराशा पडल्याचं पाहायला मिळालं. त्यातच मुंबई इंडियन्सच्या सपोर्टसाठी आलेल्या नेहा धुपिया, करिना कपूर खान या बॉलीवूड सेलिब्रेटींच्या चेहऱ्यावरचे भाव देखील काहिश्या प्रमाणात बदलल्याचं चित्र होतं.   

धोनीच्या बॅटींगवर बॉलीवूडकरही शमले

दरम्यान धोनीच्या या बॅटींगच्या अंदावर मैदानावर उपस्थित असलेल्या नेहा धुपिया, करिना कपूर खान आणि सारा तेंडूलकर यांच्या रिअॅक्शनं कॅमेऱ्याचं लक्ष वेधून घेतलं. नेहा धुपिया, करिना कपूर खान आणि सारा तेंडूलकर या तिघीही मुंबईच्या संघाला चिअर करताना दिसत होत्या. पण धोनीच्या बॅटींगपुढे त्यांनाही नमतं घ्यावं लागलं. त्यामुळे त्याच्या चार चेंडूमुळे संपूर्ण मैदानावर धोनीमय वातावरण झाल्याचं पाहायला मिळालं.  

मुंबईची गोलंदाजी कशी राहिली ?

जसप्रीत बुमराहचा अपवाद वगळता एकाही गोलंदाजाला धावा रोखण्यात यश आले नाही. जसप्रीत बुमराहला विकेट मिळाली नाही, पण त्यानं चार षटकात फक्त 27 धावा खर्च केल्या. मुंबईकडून गेराल्ड कोइत्जे, श्रेयस गोपाल आणि हार्दिक पांड्या यांना विकेट मिळाल्या. हार्दिक पांड्या सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, त्यानं दोन फलंदाजांना तंबूत धाडलं. कोइत्जे आणि श्रेयस गोपाल यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली. रोमिरिओ शेफर्ड सर्वात महागडा गोलंदाज ठरला. शेफर्ड यानं दोन षटकात 33 धावा खर्च केल्या. 

ही बातमी वाचा : 

Nilesh Sable New Comedy Show : ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ कार्यक्रमाची तारीख बदलली, निलेश साबळे आणि टीम 'या' दिवसापासून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
Shahrukh Khan :  किंग खान शाहरुख रचणार इतिहास, हा पुरस्कार मिळवणारा पहिला भारतीय अभिनेता
किंग खान शाहरुख रचणार इतिहास, हा पुरस्कार मिळवणारा पहिला भारतीय अभिनेता
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
Nawab Malik: देवेंद्र फडणवीसांच्या दबावामुळे दूर ठेवलेल्या नवाब मलिकांना अजितदादांनी बैठकीला बोलावलं, देवगिरी बंगल्यावर नेमकं काय घडलं?
देवेंद्र फडणवीसांचा दबाव झुगारुन नवाब मलिकांना निमंत्रण, अजितदादा गटाच्या बैठकीची जोरदार चर्चा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  7:00AM : 3 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा :  7:30 AM:  03 JULY  2024TOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 3 July 2024 :6 AM: ABP MajhaABP Majha Headlines :  6:30AM : 3 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
Shahrukh Khan :  किंग खान शाहरुख रचणार इतिहास, हा पुरस्कार मिळवणारा पहिला भारतीय अभिनेता
किंग खान शाहरुख रचणार इतिहास, हा पुरस्कार मिळवणारा पहिला भारतीय अभिनेता
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
Nawab Malik: देवेंद्र फडणवीसांच्या दबावामुळे दूर ठेवलेल्या नवाब मलिकांना अजितदादांनी बैठकीला बोलावलं, देवगिरी बंगल्यावर नेमकं काय घडलं?
देवेंद्र फडणवीसांचा दबाव झुगारुन नवाब मलिकांना निमंत्रण, अजितदादा गटाच्या बैठकीची जोरदार चर्चा
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
Embed widget