CSK vs GT FInal: आयपीएल फायनल मॅच पाहून भारावले बॉलिवूड कलाकार; सोशल मीडियावर सीएसके आणि गुजरात टायटन्सचं केलं कौतुक
बॉलिवूडमधील काही कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.
CSK vs GT FInal: चेन्नई सुपर किंग्सनं (Chennai Super Kings) गुजरात टायटन्सचा पराभव करुन आयपीएलच्या (IPL 2023 Final) ट्रॉफीवर पाचव्यांदा नाव कोरलं आहे. चेन्नई सुपर किंग्सच्या विजयाचा आनंद या टीमच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केला. आता बॉलिवूडमधील काही कलाकारांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन चेन्नई सुपर किंग्सला शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh), कार्तिक आर्यन (Kartik Aaryan), अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चेन्नई सुपर किंग्स या संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.
रणवीर सिंहची पोस्ट
रणवीर सिंहनं ट्वीट शेअर करुन चेन्नई सुपर किंग्स या संघाचं कौतुक केलं आहे. रणवीरनं ट्वीटमध्ये लिहिलं, 'रविंद्र सिंह जाडेजा, ओह माय गॉड. व्हाट अ फिनिश व्हाट!!! अ फाइनल!!!'
RAVINDRASINH JADEJA !!!!!
— Ranveer Singh (@RanveerOfficial) May 29, 2023
OH MY GODDDDDDDDDDDDDD
🏏 💥💥💥💥💥💥💥#CSKvsGT #IPLOnStar @StarSportsIndia @imjadeja @ChennaiIPL 🏆
WHAT A FINISH !!!! WHAT A FINAL !!!!! #RavindraJadeja #Jadeja #Jaddu #IPL2023Final @IPL #ChennaiSuperKings pic.twitter.com/PjJO1P2UxO
रणवीरनं गुजरात टायटन्स या टीमसाठी देखील एक खास ट्वीट शेअर केलं. या ट्वीटमध्ये त्यानं लिहिलं, 'हार्दिकचे उत्तम नेतृत्व द फाइट अँड माइट ऑफ थिस टीम'
Hardik’s talismanic leadership 💯 @hardikpandya7
— Ranveer Singh (@RanveerOfficial) May 29, 2023
The fight and might of this team✊🏽 @gujarat_titans
Vanquished but gallant all the way! ⚔️ #AavaDe #IPLOnStar @StarSportsIndia #IPLFinals #IPL2023Final #HardikPandya #CSKvsGT @IPL pic.twitter.com/HGlsJOQeFV
अभिनेता कार्तिक आर्यननं चेन्नई सुपर किंग्सचा विजय झाल्यानंतर इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली. त्यानी पोस्टमध्ये लिहिलं, 'अंगावर शहारे आले.'
अभिषेक बच्चनचं ट्वीट
अभिनेता अभिषेक बच्चननं ट्वीट शेअर करुन चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स या दोन्ही टीमचे कौतुक केले आहे. 'चेन्नई सुपर किंग्सचे अभिनंदन, WHAT A FINAL, गुजरात टायटन्स तुम्ही चांगले खेळलात' असं अभिषेकनं ट्वीटमध्ये लिहिलं.
Congratulations @ChennaiIPL WHAT A FINAL!!! Commiserations to @gujarat_titans well played. @IPL
— Abhishek 𝐁𝐚𝐜𝐡𝐜𝐡𝐚𝐧 (@juniorbachchan) May 29, 2023
अभिनेत्री अथिया शेट्टीनं देखील पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्रा सारा अली खान यांनी देखील आयपीएलचा अंतिम सामना पाहिला.
संबंधित बातम्या