Instagram Rich List 2019 | प्रियांका आणि विराटचा समावेश, एका पोस्टसाठी आकारतात कोट्यवधी रुपये
इन्स्टाग्रामच्या श्रीमंतांच्या यादीत अमेरिकेतील रिअॅलिटी टीव्ही स्टार आणि मॉडेल काइली जेनर पहिल्या स्थानावर आहे. काइलीचे 141 मिलियन फॉलोअर्स आहेत.
मुंबई : बॉलिवूडमधून हॉलिवूडपर्यंतचा प्रवास करणारी 'देसीगर्ल' प्रियांका चोप्राने आणखी एक मोठं यश मिळवलं आहे. HopperHQ.com द्वारे जारी करण्यात आलेल्या इन्स्टाग्राम श्रीमंतांच्या यादीत प्रियांका भारतातील एकमेव अभिनेत्री आहे. या लिस्टमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचंही नाव आहे. मात्र या यादीत प्रियांकाने विराटला मागे टाकलं आहे.
सेलिब्रिटी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एखाद्या प्रमोशनल पोस्टसाठी किती पैसे आकारतात HopperHQ ची इन्स्टाग्राम श्रीमंतांची यादी ठरवली जाते. या यादीत भारतातील दोन सेलिब्रिटींनी जागा मिळवली आहे.
View this post on Instagram
इन्स्टाग्रामवर प्रियांका चोप्राचे 43.3 मिलियन म्हणजे जवळपास 4 कोटी 30 लाख फॉलोअर्स आहेत. इन्स्टाग्राम श्रीमंतांच्या यादीत प्रियांका चोप्रा 19 व्या स्थानावर आहे. प्रियांका एखादी प्रमोशनल पोस्ट तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यासाठी 1 कोटी 86 लाख रुपये घेते.
प्रियांकानंतर या यादीत केवळ विराट कोहलीचं नाव आहे. विराटचे इन्स्टाग्रामवर जवळपास 38.2 मिलियन म्हणजे 3 कोटी 80 लाख फॉलोअर्स आहेत. विराट या यादीत 23 व्या स्थानावर आहे. विराट एखाद्या प्रमोशनल पोस्टसाठी 1 कोटी 35 लाख रुपये आकारतो.
इन्स्टाग्रामच्या श्रीमंतांच्या यादीत अमेरिकेतील रिअॅलिटी टीव्ही स्टार आणि मॉडेल काइली जेनर पहिल्या स्थानावर आहे. काइलीचे 141 मिलियन फॉलोअर्स आहेत. काइली एका पोस्टसाठी 8 कोटी 70 लाख रुपये आकारते. त्यानंतर या यादीत एरियाना ग्रांडे, ख्रिस्तियानो रोनाल्डो, किम कर्दाशिया, सेलेना गोमेज आणि ड्वायन जॉन्सन या सेलिब्रिटींचा समावेश आहे.
View this post on Instagram