Oscars 2022 : ऑस्करच्या शर्यतीतून भारताची 'रायटिंग विथ फायर' बाहेर, भारतीय सिनेप्रेक्षक निराश
Oscars 2022 : 'ऑस्कर 2022' मध्ये भारताच्या 'रायटिंग विथ फायर' या माहितीपटाला नामांकन मिळाले होते.
Oscars 2022 : सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणारा 'ऑस्कर पुरस्कार' (Oscars 2022) सोहळ्याकडे आज मनोरंजनसृष्टीसह सिनेप्रेक्षकांचे लक्ष लागले होते. यंदाच्या 94 व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यात भारतही शर्यतीत होता. 'ऑस्कर 2022' मध्ये भारताच्या 'रायटिंग विथ फायर' (Writing With Fire) या माहितीपटाला नामांकन मिळाले होते. पण अमेरिकेच्या 'समर ऑफ सोल' (Summer of Soul) या माहितीपटाने सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार पटकावला आहे.
भारतीय सिनेप्रेक्षक निराश
'रायटिंग विथ फायर' या माहितीपटाला ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार न मिळाल्याने भारतीय सिने प्रेक्षक निराश झाले आहेत. याआधी ऑस्करच्या शर्यतीत उतरलेल्या 276 सिनेमांची यादी जाहीर झाली होती. त्यात सूर्याचा 'जय भीम' आणि मोहन लालच्या 'मरक्कर'चादेखील समावेश होता. पण हे सिनेमेदेखील ऑस्करच्या शर्यतीत मागे राहिले होते.
ऑस्कर पुरस्काराच्या नामांकनात 'रायटिंग विथ फायर' हा माहितीपट सामिल झाल्याने भारतीय सिने प्रेक्षक आनंदी झाले होते. हा सिनेमा पत्रकारितेवर आधारित आहे. ऑक्सरआधी या सिनेमाला सनडान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ज्युरी अवॉर्ड मिळाला आहे. तसेच मीडिया रिपोर्ट्सनुसार, या सिनेमाने आतापर्यंत जवळपास 20 आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावले आहेत.
'रायटिंग विथ फायर' या माहितीपटाचे दिग्दर्शन रिंटू थॉमस आणि सुष्मित घोष यांनी केले आहे. 'राइटिंग विथ फायर' सिनेमात 'खबर लहरिया'च्या उदयाची गोष्ट सांगितली आहे. 'खबर लहरिया' हे एक भारतातील वृत्तपत्र आहे. हे दलित महिलांनी चालवलेले भारतातील एकमेव वृत्तपत्र आहे. या माहितीपटात दलित महिलांवर भाष्य करण्यात आले आहे. 27 मार्च रोजी ऑस्कर विजेत्यांची नावे जाहीर केली जाणार आहेत.
संबंधित बातम्या
Oscars 2022 : ऑस्कर विजेत्या 'ड्युन' चित्रपटाच्या व्हीएफएक्सची धुरा सांभाळणारे भारतीय वंशाचे नमित मल्होत्रा! जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
Oscar 2022 : 'कोडा' ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट, ऑक्सर पुरस्कार सोहळ्यात मिळाले स्टँडिंग ओव्हेशन
Will Smith Won Oscars 2022 : विल स्मिथ, हॉलिवूडमधील घराघरात पोहोचलेलं नाव, अष्टपैलू 'फ्रेश प्रिन्स'ची गाजलेली कारकीर्द
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha