एक्स्प्लोर

Imaran Khan : फ्लॉप झाल्यामुळे सोडला अभिनय,आता 10 वर्षांनी आमिर खानच्या सिनेमातून दमदार कमबॅक करणार अभिनेता 

Imaran Khan :  अभिनेता इमरान खान पुन्हा एकदा त्याचं बॉलीवूड पदार्पण करणार आहे. तो आमिर खानच्या चित्रपटात झळकणार आहे. 

Imaran Khan :  बॉलीवूड अभिनेता इमरान खान (Imaran Khan) जवळपास एक दशकाने पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर कमबॅक करणार आहे. त्याच्या या कमबॅकसाठी त्याला त्याच्या मामाचा म्हणजेच आमिर खानचा (Aamir Khan) सपोर्ट मिळाला आहे. आमिर खानचा भाचा इमरान खानने 2008 मध्ये जेव्हा त्याचं बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं तेव्हा त्याची स्पर्धा रणबीर कपूरसोबत (Ranbir Kapoor) होती. 

इमरान खानने आपल्या मामाच्या प्रोडक्शन हाऊसकडून बनवण्यात आलेल्या जाने तू या जाने ना या सिनेमातून ब़ॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. त्याच्या या पदार्पणातच प्रेक्षकांच्या तो पसंतीस उतरला आणि त्याच्याकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा देखील वाढल्या. इमरानचा डेल्ही बेली हा सिनेमा कॉमेडीच्या बाबतीत एक कल्ट सिनेमा मानलं जातं. पण 2015 मध्ये त्याच्या कंगनासोबत आलेला कट्टी बट्टी हा सिनेमा फ्लॉप झाल्यानंतर इमरानने त्याचं अभिनय क्षेत्र सोडून दिलं. 

सलग दिले फ्लॉप सिनेमे

इमरान खानचे मटरु की बिजली का मंडोला, गोरी तेरे प्यार में, वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा आणि कट्टी बट्टी हे सिनेमे सलग आले आणि ते फ्लॉप झाले. पण पुन्हा एकदा इमरान मोठ्या पडद्यासाठी सज्ज झालाय. पीपिंग मूनच्या रिपोर्टनुसार, इमरान खानचा मामा आमिर खान एका कॉमेडी सिनेमाची निर्मिती करणार आहे. त्यामध्ये इमरान खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हॅप्पी पटेल असं त्याच्या पात्राचं नाव आहे. 

सहकलाकार करणार दिग्दर्शन

रिपोर्ट्सनुसार, ही एक पूर्णपणे कॉमेडी सिनेमा आहे. यामध्ये कॉमेडियन आणि अभिनेते वीर दास या सिनेमाचे दिग्दर्शक असणार आहेत. वीर दास हे डेल्ही बेलीमध्ये इमरानचा तो सहकलाकार होता. तसेच वीर दास त्यांच्या या सिनेमात धमाकेदार कॉमेडी घेऊन येणार असल्याचंही सांगितलं जातंय. या सिनेमाचं शूट गोव्यामध्ये सुरुही झालंय. 

सीरिजमधून करणार होता कमबॅक

याआधी एका मुलाखतीमध्ये इमरानने म्हटलं होतं की, तो डीज्नी प्लस हॉटस्टारच्या एका स्पाय सीरिजमधून कमबॅक करणार आहेत. पण मागील वर्षी जिओने डीज्नीला टेकओवर केलं आणि हे प्रोजेक्ट बंद पडलं. त्यानंतर आता इमरान खान पुन्हा एकदा मोठ्या पडद्यासाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे त्याचे चाहते देखील त्याला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक असल्याचं पाहायला मिळतंय. 

ही बातमी वाचा : 

TMKOC : 'पंजाबी सिनेमात काम करत होते, खूशही होते', तारक मेहता फेम 'सोढी' बेपत्ता झाल्यानंतर लेक 'गोगी'ने दिली प्रतिक्रिया

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget