Urfi Javed : कहर! प्लास्टिक, वायरनंतर आता ब्लेडपासून ड्रेस; उर्फीचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी लावला डोक्याला हात
उर्फीनं (Urfi Javed) आता ब्लेडपासून तयार केलेल्या ड्रेसमधील लूकचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Urfi Javed : फॅशनमुळे आणि अतरंगी स्टाईलमुळे नेहमी चर्चेत असणारी उर्फी जावेद (Urfi Javed) तिच्या फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते. उर्फीचे वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. उर्फी ही कधी प्लास्टिकचा, कधी वायर तर कधी सेप्टीपीन्सपासून तयार केलेला ड्रेस घालून फोटोशूट करते. अनेक लोक उर्फीला तिच्या या फॅशनमुळे ट्रोल करतात तर काही जण तिचं कौतुक देखील करतात. उर्फीनं आता ब्लेडपासून तयार केलेल्या ड्रेसमधील लूकचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
उर्फीनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती तिचा अतरंगी लूक दिसत आहे. अनेक ब्लेड्सपासून तयार केलेला ड्रेस, स्मोकी मेकअप, कानात मोठे इयरिंग्स आणि पोनी टेल असा लूक उर्फीचा दिसत आहे. 'मी इंट्रोवर्ट्स लोकांसाठी हा ड्रेस तयार केला आहे. रेजर कट. यासाठी मी माझ्या टीमचे आभार मानते.' असं कॅप्शन उर्फीनं या व्हिडीओला दिलं आहे. उर्फीनं शेअर केलेल्या या व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'नेक्स्ट लेवल' तर दुसऱ्यानं लिहिलं, 'हे काय केलंस?'
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
अॅक्टिंग, मॉडेलिंग आणि जाहिरातींमध्ये उर्फी काम करते. दुर्गा, सात फेरों की हेराफेरी, बेपनाह, जीजी मां, डायन, ये रिश्ता क्या कहलाता है, पंच बीट सीजन 2 आणि कसौटी जिंदगी की या प्रसिद्ध मालिकांमध्ये उर्फीनं काम केलं आहे. उर्फीच्या सोशल मीडियावरील पोस्टला देखील नेटकऱ्यांची पसंती मिळते. तिचे वेगवेगळे लूक हे चर्चेत असतात. एका मुलाखतीमध्ये उर्फीनं सांगितलं की, 'मला कोणी काम देत नाही, तसेच माझ्याकडे देखील पैसे नाहीत. ' ऐ मेरे हमसफर, जीजी मां, मेरी दुर्गा, बेपनाह, चंद्र नंदिनी या शोमध्ये काम केलं आहे. 2015 मधील टेडी-मेडी फॅमिली या मालिकेमधून उर्फीनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. उर्फी 40 ते 55 लाखांची संपत्तीची मालकीन आहे. उर्फी मालिकेच्या एका एपिसोडमध्ये काम करण्यासाठी 25 ते 35 हजार मानधन घेते.
हेही वाचा:
Before You Go
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग





















