Huma Qureshi: 'हुमा कुरेशी प्रेग्नंट आहे का?' व्हायरल व्हिडीओला नेटकऱ्यांच्या कमेंट्स
हुमा कुरेशीच्या (Huma Qureshi) व्हायरल व्हिडीओला कमेंट करुन काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं.
Huma Qureshi : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री हुमा कुरेशीला (Huma Qureshi) अनेक वेळा नेटकरी ट्रोल करतात. हुमाच्या महारानी या वेब सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या सीरिजच्या दुसऱ्या सीझनचे देखील अनेकांनी कौतुक केलं. काही दिवसांपूर्वी हुमानं एका पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात महारानी-2 या सीरिजमधील अभिनयासाठी हुमाला पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. पुरस्कार सोहळ्यासाठी हुमानं ग्लॅमरस लूक केला होता. या लूकला काही नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. हुमाचा या पुरस्कार सोहळ्यातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
नेटकऱ्यांच्या कमेंट्स
हुमाचा एका पुरस्कार सोहळ्यातील रेड कार्पेटवरील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स करुन अनेकांनी हुमाला ट्रोल केलं. एका नेटकऱ्याने कमेंट केली, 'हुमा कुरेशी प्रेग्नंट आहे का?' तर दुसऱ्या युझरने कमेंट केली की, 'या ड्रेसमुळे ती प्रेग्नंट दिसत आहे.' हुमाने या पुरस्कार सोहळ्यासाठी ब्लू साडी, स्टोनचे इअरिंग्स असा लूक केला होता.
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
पुरस्कार सोहळ्यासाठी केलेल्या लूकचा फोटो हुमाने सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोला तिने कॅप्शन दिलं, 'महारानी-2 या वेब सीरिजला दिलेल्या प्रतिसादाबद्दल मी तुमचे आभार मानते. आता तिसऱ्या सीझनची तयारी करत आहे.'
View this post on Instagram
हुमाने तिच्या बदलापूर, गँग्स ऑफ वासेपूर आणि जॉली एल एल बी या चित्रपटातील अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. हुमाचा चाहता वर्ग मोठा आहे. काही दिवसांपूर्वी तिचा 'डबल एक्सएल' (Double XL) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटामध्ये हुमासोबतच सोनाक्षी सिन्हाने देखील प्रमुख भूमिका साकारली. डबल एक्सएल या चित्रपटामधील सायरा ही भूमिका सोनाक्षी सिन्हाने साकारली आहे. तर या चित्रपटामधील राजश्री ही भूमिका हुमा कुरेशीने साकारली आहे. तसेच या चित्रपटात झहीर इक्बाल, महत राघवेंद्र यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. डबल एक्सएल हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.
सतराम रमणी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तर भूषण कुमार, कृष्ण कुमार, विपुल डी शाह, राजेश बहल आणि अश्विन वर्दे, साकिब सलीम, मुदस्सर अजीज यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Photo : हुमा कुरेशीचा साडी लूक पाहिला का?