हृतिक रोशन हॉलिवूडपटात झळकणार?
हृतिक रोशनच्या चाहत्यांसाठी सुखद बाातमी आहे. हृतिक हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. हॉलिवूडपटात एका गुप्तहेराच्या भूमिकेसाठी हृतिकने ऑडिशन दिली आहे.

मुंबई : रोमन गॉड म्हणून ओळख मिळवलेला भारतातला एकमेव अभिनेता, नायक आहे तो हृतिक रोशन. त्याचं धारदार नाक.. तितकेच भेदक डोळे.. भुरळ पडावी अशी शरीरयष्टी आणि मोहून टाकणारी देहबोली बघून भले भले वेडावले. भारतातल्या तमाम मुलींचा आणि मुलांचा तो गळ्यातला ताईत बनला. प्रत्येक मुलगी आपल्या प्रियकरात हृतिकला बघू लागली. तर प्रत्येक मुलगा आपण हृतिकसारखा होण्याचा प्रयत्न करु लागला.
हृतिकने केलेल्या चित्रपटांमुळे तो लहान मुलांमध्येही लोकप्रिय झाला. हृतिकने सातत्याने वेगवेगळे चित्रपट दिले. 'कहो ना प्यार है' या चित्रपटापासून सुरु झालेला त्याचा प्रवास आता वीस वर्षांचा झाला आहे. या वीस वर्षात त्याने अनेक उत्तमोत्तम सिनेमे दिले. यात कहो ना प्यार है, क्रिश, फिशन कश्मीर, जिंदगी मिलेगी ना दोबारा, बॅंग बॅंग, लक्ष्य आदी अनेक सिनेमांचा समवेश होतो. आता त्या पलिकडे उडी घेत हा भारतीय अभिनेता हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. हॉलिवूडपटात एका गुप्तहेराच्या भूमिकेसाठी हृतिकने ऑडिशन दिली आहे. त्याची एकूण शरीरयष्टी.. त्याच्या अॅक्शनमुळे त्याला या सिनेमात घेण्याचा विचार हॉलिवूडवाले करता आहेत. ही ऑडिशन अनेकांना कळलीही नाही. पण लॉकडाऊन काळात हृतिकने ही ऑडिशन दिली आहे. शिवाय, हॉलिवूडवाल्यांना ही ऑडिशन आवडली आहे. या सिनेमासाठी जर हृतिकची निवड झाली तर पुढच्या वर्षी हृतिकला काही दिवस या सिनेमासाठी द्यावे लागतील.
हृतिकच्या चाहत्यांसाठी ही सुखद बाातमी आहे. त्याच्या काही चित्रपटांमधून त्याने केलेला अॅक्शन सिक्वेन्स लक्षात घेऊन त्याचा विचार होतो आहे. शिवाय, हृतिकचं दिसणं ही कुणा परदेशी अभिनेत्यापेक्षा कमी नाही. म्हणूनच त्याला ग्रीक गॉडची उपमा त्याचे चाहते देतात. आता हा सिनेमा त्याला मिळतो की नाही ह कळायला मात्र आणखी थोडी वाट पाहावी लाागणार आहे.
Before You Go
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग





















