14 वर्षांचा संसार मोडला, 12 वर्षांनी लहान अभिनेत्रीला केलं डेट; आता ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान गर्लफ्रेंडसोबत मूव्ही डेट
Hrithik Roshan-Saba Azad Breakup : हृतिक रोशन आणि गर्लफ्रेंड सबा आझाद यांच्या ब्रेकअपच्या बातम्या सध्या चर्चेत आहेत.
Hrithik Roshan-Saba Azad Breakup : बॉलिवूड कलाकारांचं रिल लाईफपेक्षा रिअल लाईफ जास्त चर्चेत असतं. बॉलीवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत जे त्यांच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असतात. असा एक अभिनेता आहे ज्याचे चाहते फक्त त्याच्या चित्रपटांची तर वाट पाहतातच पण त्याच्या वैयक्तिक आयुष्यात काय चालले आहे हे जाणून घेण्यास जास्त उत्सुक असतात. अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) चित्रपटांपेक्षा त्याच्या पर्सनल लाईफमुळे जास्त चर्चेत असतो. हृतिकचं 14 वर्षांचे लग्न मोडलं आणि त्याने 12 वर्षांनी लहान अभिनेत्रीला डेट केलं. मीडिया रिपोर्टनुसार, हृतिक आणि सबा यांच्यां ब्रेकअपच्या बातम्या सध्या समोर येत आहेत.
ह्रतिक रोशन आणि सबा आझादचा ब्रेकअप?
अभिनेता हृतिक रोशन आणि सुझान खान यांचा 14 वर्षांचा संसार मोडला, तेव्हा चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. यानंतर ह्रतिक 12 वर्षांनी लहान अभिनेत्री सबा आझादला डेट करत असल्याचं समोर आलं तेव्हा चाहत्यांना आणखीनच मोठा धक्का बसला. त्यानंतर आता अभिनेता हृतिक रोशन आणि सबा आझाद यांचं ब्रेकअप झालं असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहेत. पण या कपलच्या ब्रेकअपच्या बातम्या समोर येत असताना दोघांनी एकत्र येऊन सर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे.
ह्रतिक आणि सुझानचा घटस्फोट
हृतिक रोशनने 2000 मध्ये सुझान खानसोबत लग्न केलं होतं. हृतिक रोशन आणि सझैन यांचा प्रेमविवाह झाला होता, तो 14 वर्षे टिकला. लग्नाच्या 14 वर्षानंतर हृतिक आणि सुझान यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. या जोडप्याला दोन मुलेही आहेत. दोन्ही मुले हृतिकसोबत राहतात. पण, हृतिक आणि सुझान दोन्ही मुलांसोबत वेळ घालवतात.
सबासोबत ब्रेकअप झाल्याच्या चर्चा
View this post on Instagram
हृतिक रोशन आणि सबा आझाद अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. या दोघांनी नेहमीच आपलं नातं सार्वजनिक ठेवलं आहे. सबाला अनेकदा हृतिकच्या कुटुंबासोबत पाहिलं जातं. दोघेही कुटुंबासोबत वेळ घालवतात आणि सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत असतात. सबाने हृतिकसोबतच्या नात्याबद्दल अनेकदा भाष्य केलं आहे. दोघांनी एकत्र राहण्यासाठी काही काळापूर्वी घरही घेतलं होतं. काही दिवसांपासून ह्रतिक आणि सबाच्या ब्रेकअपच्या बातम्या येत होत्या. अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नाला हृतिक एकटाच पोहोचला होता. याशिवाय फराह खानच्या आईच्या अंत्यसंस्कारालाही हृतिक एकटाच दिसला होता. त्यामुळे त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलं.
ब्रेकअपच्या बातम्यांनी पूर्णविराम
हृतिक आणि सबाने आता त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्यांना पूर्णविराम दिला आहे. हे कपल एका मूव्ही डेटवर गेले होते. हृतिक आणि सबा एकत्र हातात हात घातलेले दिसले. हृतिक आणि सबा दोघांनीही मास्क घातले होते. त्यांच्या या मूव्ही डेटचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.