DDLJ सिनेमाच्या शुटींगदरम्यानच अभिनेत्रीला मिळाली पतीच्या निधनाची बातमी, नेमकं काय घडलं होतं?
Himani Shivpuri News: अभिनेत्री हिमानी शिवपुरी यांनी अनेक सिनेमे आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. त्यांच्या अनेक भूमिका आजही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात.
![DDLJ सिनेमाच्या शुटींगदरम्यानच अभिनेत्रीला मिळाली पतीच्या निधनाची बातमी, नेमकं काय घडलं होतं? Himani Shivpuri's Tragic Life Husband Died During Dilwale Dulhania Le Jayenge Movie's Shoot DDLJ सिनेमाच्या शुटींगदरम्यानच अभिनेत्रीला मिळाली पतीच्या निधनाची बातमी, नेमकं काय घडलं होतं?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/10/31/bc7a8e3655122c1a700a2d65e609d9c81730384433773720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Himani Shivpuri: अभिनेत्री हिमानी शिवपुरी (Himani Shivpuri) यांनी 1984 मध्ये अभिनयात पदार्पण केलं. अनेक सिनेमांमधून त्या प्रेक्षकांच्या भेटीस आल्या आहेत. राजा, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, हिरो नंबर 1, दीवाना मस्ताना, बंधन, कुछ कुछ होता है, हम साथ साथ है, कभी खुशी कभी गम, मैं प्रेम की दिवानी हूं, दिलवाले, खामोशी, परदेश, कोयला, देस यांसारखे सिनेमे गाजवले आहेत.
हिमानी यांनी 'हम आपके हैं कौन' या सिनेमात सलमानसोबतही काम केलं होतं. याच सिनेमाच्या सेटवर हिमानीने सलमानच्या थोबाडीत लगावली होती. याचा किस्सा स्वत: हिमानी यांनी सांगितला होता. पण दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे सिनेमाचं शुटींग सुरु असतानाच हिमानी यांना त्यांचे पती ज्ञान शिवपुरी यांच्या निधनाची बातमी मिळाली होती.
सेटवरच मिळाली पतीच्या निधनाची बातमी
हिमानी यांनी अभिनेता ज्ञान शिवपुरी यांच्याशी लग्नगाठ बांधली होती. ज्ञान शिवपुरी यांचे 1995 मध्ये निधन झाले. हिमानी आणि ज्ञान शिवपुरी यांना एक मुलगाही आहे. बऱ्याच लोकांना हे माहित नाही की, हिमानी जेव्हा 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे'चे शूटिंग करत होत्या तेव्हात त्यांना सेटवर ज्ञान शिवपुरी यांच्या निधनाची बातमी मिळाली होती. त्यावेळी अभिनेत्री चित्रपटाच्या क्लायमॅक्सचे शूटिंग करत होत्या.
हिमानीने सलमानच्या कानशिलात लगावली होती
हिमानी यांनी हम आपकें हैं कोन या सिनेमाच्या शुटींगदरम्यान सलमानच्या कानशिलात लगावली होती. यावेळी हिमानीने सांगितलं की, 'जेव्हा मी सलमानला पहिल्यांदा भेटले तेव्हा सूरज बडजात्या आम्हाला सीनबद्दल सांगत होते. शूटिंगदरम्यान अचानक सलमान म्हणाला, आंटी जान आणि मला उचलले. त्यावेळी मी त्याला मज्जेत कानशिलात लगावली होती. सलमान खूप खोडकर होता.
View this post on Instagram
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)