एक्स्प्लोर

Hema Malini Dharmendra : धर्मेंद्र यांच्याशी लग्न करण्यासाठी एका कारणाने हेमा मालिनीचा सुद्धा होता विरोध!, म्हणाल्या,"ते चांगले होते, पण..."

Hema Malini Dharmendra : धर्मेंद्र आणि हेमा मालिनी बॉलिवूडमधील लोकप्रिय कपलपैकी एक आहेत. पण खरंतर धर्मेंद्र यांच्यासोबत लग्नबंधनात अडकण्यास हेमा मालिनी आधी तयार नव्हत्या.

Hema Malini Dharmendra : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) आणि 'ड्रीम गर्ल' हेमा मालिनी (Hema Malini) ही बॉलिवूडची लोकप्रिय जोडी आहे. दोघांचाही मोठा चाहतावर्ग आहे. रुपेरी पडद्यावर दोघांनीही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्यांच्या लव्हस्टोरीचे किस्सेदेखील चांगलेच लोकप्रिय आहेत. हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न करण्यासाठी धर्मेंद्र काहीही करायला तयार होते. पण तरीही हेमा मालिनी यांना धर्मेंद्र यांच्यासोबत लग्न करायचं नव्हतं. 

हेमा मालिनीने स्वत:चं केला खुलासा

सिमी गरेवालच्या कार्यक्रमात हेमा मालिनीने धर्मेंद्रबद्दलच्या नात्याबद्दल भाष्य केलं आहे. हेमा मालिनी म्हणाल्या,"धर्मेंद्रवर माझं प्रेम असलं तरी त्याच्यासोबत लग्न करण्यासाठी सुरुवातीला मी तयार नव्हते. धर्मेंद्र दिसायला खूप चांगला होता. पण म्हणून मी त्याच्यासोबत लग्न करण्यासाठी तयार होते असं नाही. उलट मी विचार करायचे की, जर मला संसार थाटायचा असेल तर मी धर्मेंद्रसारख्या एका व्यक्तीचा विचार करेल".

हेमा मालिनीने खुलासा केला की,"धर्मेंद्र आणि मी अनेक सिनेमांत एकत्र काम केलं आहे. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान आमची मैत्री अधिक घट्ट झाली. त्यावेळी धर्मेंद्रने अचानक मला पुन्हा एकदा लग्नासाठी विचारलं. मीदेखील त्यावेळी काहीही विचार न करता लगेचच लग्नासाठी होकार दिला".

हेमा मालिनी अन् धर्मेंद्र यांची फिल्मी लव्हस्टोरी (Hema Malini Dharmendra Love Story)

हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची पहिली भेट 1970 रोजी 'तुन हसीन मैं जवान' या सिनेमाच्या सेटवर झाली. त्यावेळी धर्मेंद्र यांचं एक लग्न झालं होतं. पण या सिनेमाच्या सेटवर हेमा मालिनी आणि धर्मेंद्र एकमेकांच्या प्रेमात पडले. अखेर 1980 मध्ये ते लग्नबंधनात अडकले.

हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांचं नातं अभिनेत्रीच्या वडिलांना मान्य नव्हतं. धर्मेंद्र त्यांना पसंत नव्हते. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या प्रेमाच्या चर्चा सुरू झाल्या तेव्हा त्यांच्यासोबत कुटुंबातील काही सदस्य शूटवर उपस्थित असायचे. हेमा मालिनी यांच्यासोबत अनेकदा त्यांचे वडील सेटवर यायचे. पण तरीही धर्मेंद्र यांनी माघार घेतली नाही. पुढे सगळी  बंधन झुगारत दोघांनी 1980 मध्ये लग्नगाठ बांधली. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांचे सिनेमे आजही चाहते आवडीने पाहतात. काही दिवसांपूर्वी धर्मेंद्र यांची प्रकृती खालावली होती. पण आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. 

संबंधित बातम्या

Hema Malini : हेमा मालिनी रामलला चरणी लीन, सहकुटुंब अयोध्येत घेतले रामाचे दर्शन, सोशल मीडियावर फोटो शेअर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Full | राज्याच्या राजकारणाची पातळी आणखी किती घसरणार? खोतांचं पवारांविषयी वादग्रस्त वक्तव्यZero Hour | अजितदादांचा नबाव मलिकांसाठी प्रचार, महायुतीतल्या मतभेदाची दरी वाढवणार का?Zero Hour | राज्याचं राजकारण कुठे चाललंय? राजकारणाची ही संस्कृती नाही? ABP MajhaLaxman Hake Car Vandalized : मराठा आंदोलकांनी फोडली लक्ष्मण हाकेंची कार, वातावरण तापलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget