Health Update | अमिताभ बच्चन आणि कुटुंबियांच्या प्रकृतीत सुधारणा
स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरनुसार, अमिताभ आणि अभिषेक यांची रुग्णालयात दाखल झाल्यापासून सातव्या दिवशी कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. कोरोना चाचणीचा अहवाल नेगेटिव्ह आल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात येणार आहे.
मुंबई : कोरोनाची लागण झाल्यामुळे बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चन यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आयसोलेशन वॉर्डमध्ये शनिवारपासून दाखल असलेले अमिताभ बच्चन यांची प्रकृती स्थिर आहे. तसेच त्यांच्या तब्येतीत सुधारणाही होत आहे. रुग्णालयात दाख करण्यापूर्वी अमिताभ यांना कफचा त्रास होत होता. आता त्यांचा त्रास 90 टक्क्यांनी कमी झाला आहे. अमिताभ यांची ऑक्सिजन लेव्हलही आता सामान्य आहे. त्यांना देण्यात येणाऱ्या ट्रिटमेंटचा त्यांच्यावर सकारात्मक परिणाम होत आहे.
अमिताभ यांचं वय आणि त्यांची मेडिकल हिस्ट्री पाहून नियंत्रित पद्धतीने त्यांना औषधं देण्यात येत आहे. सुत्रांनी एबीपी न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, अमिताभ यांची प्रकृती स्थिर असून सध्या चिंतेचं कोणतंही कारण नाही. तसेच 77 वर्षीय अमिताभ बच्चन यांची डॉक्टर्सही काळजी घेत असून त्यांना नियंत्रित पद्धतीने औषधं देण्यात येत आहेत.'
दरम्यान, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरनुसार, अमिताभ आणि अभिषेक यांची रुग्णालयात दाखल झाल्यापासून सातव्या दिवशी कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. कोरोना चाचणीचा अहवाल नेगेटिव्ह आल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात येणार आहे. अमिताभ आणि अभिषेक यांची कोरोना चाचणी शुक्रवारी किंवा शनिवारी करण्यात येणार आहे.
वाईट सवयींपासून दूर राहण्याचा बिगबींचा सल्ला
लोकांना चांगल्या सवयींसाठी प्रेरित करणारी पोस्ट अमिताभ यांनी केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून ट्वीट केलं आहे की, "सभी से ईर्ष्या, घृणा करने वाले, असंतोषी, क्रोधी, सदा संदेह करने वाले और पराये आसरे जीने वाले ये छः प्रकार के मनुष्य हमेशा दुखी रहते हैं. अतः यथा संभव इन प्रवृत्तियों से बचना चाहिए."
दरम्यान, अमिताभ बच्चन नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये सहा प्रकारे दुःखी असमाऱ्या व्यक्तींबाबत सांगितलं आहे. तसेच नकारात्मक प्रवृत्तींपासून बचाव करण्याचा सल्ला बिगबींनी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
अमिताभ बच्चन यांची प्रकृती स्थिर; रुग्णालयातील डॉक्टरांसाठी लिहिली कविता
प्रतिमा सुधारण्यासाठी नानावटी रुग्णालयाकडून अमिताभ बच्चन यांची मदत? व्हायरल पोस्टवरुन प्रश्न उपस्थित
बिग बी अमिताभ यांच्यासह अभिषेक बच्चनची प्रकृती स्थिर, काळजीचं कारण नाही
ऐश्वर्या रॉय बच्चन आणि आराध्या यांनाही कोरोनाची लागण
बिग बी यांच्या उत्तम प्रकृतीसाठी पाकिस्तानमध्ये प्रार्थना, शोएब अख्तरचं ट्वीट