एक्स्प्लोर
'राम जन्मभूमी' सिनेमाच्या रिलीजला हायकोर्टाची आडकाठी
'राम जन्मभूमी' या सिनेमामुळे धार्मिक भावना दुखवल्या जातील, असा आक्षेप घेत या सिनेमाच्या रिलीज विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या सिनेमात दोन्ही धर्मियांच्या भावना दुखावणारे काही सीन्स असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.
मुंबई : अयोध्येतील जमिनीच्या वादावर आधारित सिनेमा ‘राम जन्मभूमी’ सेन्सॉर बोर्डाच्या परवानगीशिवाय प्रदर्शित करता येणार नाही, असे आदेश देत मुंबई उच्च न्यायालयाने सिनेमाच्या निर्मात्यांना चांगलाच दणका दिला आहे. सेन्सॉर बोर्डाच्या परवानगीविनाच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. याची दखल घेत कोर्टाने यूट्यूबला हा ट्रेलर तात्काळ हटवण्याचे आदेशही दिले आहेत. तसंच सेन्सॉर बोर्डाच्या परवानगीशिवाय सिनेमाचं पोस्टरही रिलीज न करण्याचं कोर्टाने बजावलं.
या सिनेमामुळे धार्मिक भावना दुखवल्या जातील, असा आक्षेप घेत या सिनेमाच्या रिलीज विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या सिनेमात दोन्ही धर्मियांच्या भावना दुखावणारे काही सीन्स असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. अझहर तांबोळी नावाच्या व्यक्तीने ही याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर ही याचिका दाखल करण्यात आली असून 19 जानेवारीला यावर पुढील सुनावणी आहे.
शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी हा सिनेमा बनवला असून, रिझवी स्वत: लेखक आहेत. मनोज जोशी आणि गोविंद नामदेव यांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत. हा सिनेमा डिसेंबर महिन्यात हा सिनेमा रिलीज करण्याची घोषणा करण्यात आली होती. या सिनेमानं देशातील वातावरण बिघडेल त्यामुळे हा सिनेमा रिलीज करण्यास मनाई करण्यात यावी, असा आक्षेप घेत याचिका दाखल करण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement