एक्स्प्लोर
बायोपिकमध्ये हर्षवर्धन कपूर अभिनव बिंद्राच्या भूमिकेत
हर्षवर्धन कपूरने मंगळवारी अभिनव बिंद्रासोबतचा फोटो शेअर करुन ही माहिती दिली
मुंबई : बॉलिवूड अभिनेता आणि अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन कपूर ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्राच्या भूमिकेत दिसणार आहे. सोशल मीडियावरुन हर्षवर्धन कपूरने याबाबत माहिती दिली आहे.
हर्षवर्धन कपूरने मंगळवारी अभिनव बिंद्रासोबतचा फोटो शेअर करुन ही माहिती दिली. ‘’सुरुवात खुप चांगली आहे. विशेषतः तुम्हाला अशा व्यक्तीची भूमिका साकारायला मिळते, ज्याने जागतिक स्तरावर देशाला गौरव मिळवून दिला आहे,’’ असं हर्षवर्धन कपूरने फोटो शेअर करताना म्हटलं आहे.
मला अभिनव बिंद्राची भूमिका साकारण्यासाठी निवडण्यात आलं आहे आणि अपेक्षा आहे की या भूमिकेला मी न्याय देईल, असंही हर्षवर्धन कपूरने म्हटलं. हर्षवर्धन कपूरने 'मिर्झिया' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. सध्या तो विक्रमादित्य मोटवानी यांचा आगामी सिनेमा 'भावेश जोशी'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा सिनेमा या वर्षाअखेरपर्यंत रिलीज होण्याची शक्यता आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement