क्रिकेटनंतर आता हरभजन सिंग चित्रपटाच्या पडद्यावर; टीझर रिलीज
क्रिकेटर हरभजन सिंगच्या आगामी 'फ्रेंडशिप' चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे ज्यामध्ये तो आपल्या फिल्मी करिअरला चांगली सुरुवात करताना दिसत आहे.
भारतीय संघाचा ऑफ ब्रेक स्पिनर हरभजन सिंग आता नवीन भूमिकेत पहायला मिळणार आहे. हरभजन सिंग आपल्या आगामी चित्रपटामुळे सध्या चर्चेत आला आहे. नुकताच हरभजन सिंगच्या 'फ्रेंडशिप'चा टीझर रिलीज झाला आहे. चित्रपटाचा टीझर आज म्हणजेच 1 मार्च रोजी रिलीज झाला. या टीझरला चाहत्यांची खूप पसंती मिळाली आहे. टीझरमध्ये हरभजन सिंगची वेगवेगळी पात्रं दिसली आहेत, ज्यात तो कधी फायटींग, नाचताना तर कधी दमदार अभिनय करताना दिसतोय. चित्रपटाच्या एका सीनमध्ये त्याच्या हाथी क्रिकेट बॉलही दिसत आहे. हरभजन सिंगचा हा चित्रपट दक्षिणेत बनविला गेला असून तो हिंदीमध्ये डब केला जाणार आहे.
Sharp,Crisp,Intense #FriendShipMovieTeaser of my Movie is Here.Enjoy it,Guys!
Tamil -https://t.co/LSUImD7xUG Telugu-https://t.co/unECTwvJK5 Hindi-https://t.co/BSzIWz05iG @JPRJOHN1 @akarjunofficial @shamsuryastepup #Losliya @actorsathish @JSKfilmcorp @ImSaravanan_P — Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) March 1, 2021
'फ्रेंडशिप' चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर हा चित्रपट यंदा रिलीज होईल. यापूर्वी हरभजन सिंगने 2013 साली एका पंजाबी चित्रपटात डेब्यू केला होता. पंजाबी चित्रपटात हरभजन सिंगने पोलिस कर्मचाऱ्याची भूमिका केली होती. हा चित्रपट प्रेक्षकांना चांगलाच आवडला होता. तो बर्याच टीव्ही शोमध्येही दिसला आहे. क्रिकेटबरोबरच चित्रपटात अभिनय करण्यास हरभजनला खूप आवडते. पण प्रेक्षकांना भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंगचा नवीन चित्रपट 'फ्रेंडशिप' आवडतो का हे येणारा काळचं ठरवेल.
View this post on Instagram
हरभजन सिंगने 17 एप्रिल 1998 रोजी न्यूझीलंडविरुद्ध पहिला सामना खेळला होता. त्यावेळी तो फक्त 18 वर्षांचा होता. त्याची क्रिकेट कारकीर्द जबरदस्त राहिली आहे. त्याने आपल्या शानदार गोलंदाजीने भारतीय संघाला अनेक सामने जिंकून दिले आहे.