एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बॉलिवूडची ‘चिकनी चमेली’ पस्तीशीत
“पार्टनर”, “रेस”, “सिंग इज किंग”, “वेलकम”, “जब तक है जान”, "राजनीति", "ज़िंदगी न मिलेगी दोबारा", "मेरे ब्रदर की दुल्हन" आणि "एक था टाइगर" सारख्या हीट सिनेमांद्वारे कतरीनाने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली.
मुंबई : बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील ब्युटीफुल गर्ल कतरिना कैफचा आज वाढदिवस आहे. कतरिना 35 वर्षांची झालीय. 7 जुलै 1984 रोजी हाँगकाँगमध्ये कतरिनाचा जन्म झाला. बॉलिवूडमध्ये एक यशस्वी अभिनेत्री होण्याआधी कतरिनाने अनेक मॉडेलिंग शो केले. तसेच तिने तेलुगू आणि मल्याळम चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या होत्या. चित्रपटसृष्टीत कतरिनाला ‘कॅट’ या संबोधले जाते.
कतरिनाचे वडील मोहम्मद कैफ हे काश्मिरी वंशाचे ब्रिटीश व्यावसायिक आहेत आणि आई सुझेन वकील आहे. कतरिनाला सहा बहिणी आणि एक भाऊ आहे.
कतरिनाला हिंदी बोलता येत नव्हते. तिला अभिनयही नीट करता येत नव्हता.अशा सर्व गोष्टींवर मात करत कतरिनाने बॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान मिळवले. मॉडेलिंग ते बॉलिवूड असा कतरिनाचा प्रवास खरचं थक्क करणार आहे.
कतरिनाच्या करिअरची सुरूवात
करिअरच्या सुरूवातीला तिने काही मल्याळम चित्रपटात काम केले. 2003 साली दिग्दर्शक कैझाद गुस्ताद यांच्या ‘बूम’ सिनेमातून कतरीनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात तिने महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केले. तर 2004 साली कॅटरिना ‘मल्लीस्वरी’ या मल्याळम चित्रपटात झळकली .
कतरिनाचे सुपर हीट चित्रपट
करिअरच्या दुसऱ्या वर्षी कॅटरिनाने सलमान खान बरोबर ‘मैंने प्यार क्यों किया’ चित्रपटात काम केले. त्यानंतरच या दोघांतील प्रेमसंबंधांच्या चर्चांना उधाण आलं. कतरिनाने त्या नंतर अनेक चित्रपटात काम केले.
“पार्टनर”, “रेस”, “सिंग इज किंग”, “वेलकम”, “जब तक है जान”, "राजनीति", "ज़िंदगी न मिलेगी दोबारा", "मेरे ब्रदर की दुल्हन" आणि "एक था टाइगर" सारख्या हीट सिनेमांद्वारे कतरीनाने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भंडारा
भविष्य
महाराष्ट्र
Advertisement