एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
हॅप्पी बर्थडे : अनिल कपूर 'या' डाएट आणि वर्काऊटमुळे अजूनही फिट
अनिल कपूरने त्याच्या फिटनेस योग्य डाएट आणि ठराविक वर्काऊटमुळे साध्य केला आहे. त्यामुळेच आजही तो चिरतरुण दिसतो.
मुंबई : बॉलिवूडचा झकास अभिनेता अनिल कपूर त्याचा आज 62 वा वाढदिवस साजरा करत आहे. परंतु आजही त्याने तिशीतल्या तरुणाप्रमाणे फिटनेस राखला आहे. या एव्हरग्रीन अभिनेत्याच्या फिटनेसचे रहस्य काय असे असेल असा प्रश्न सर्वांना नेहमीच पडतो. परंतु अनिलने हा फिटनेस योग्य डाएट आणि ठराविक वर्काऊटमुळे साध्य केला आहे. त्यामुळेच आजही तो चिरतरुण दिसतो.
अनिल सांगतो की, तो नेहमी अॅक्टिव्ह राहतो, सतत सकारात्मक विचार करतो. याबाबत अनिल म्हणाला की, मी अजूनही स्वतःला 24 वर्षांचा समजतो. मी कधीच स्वस्थ बसत नाही. मी आठवड्याचे सहा दिवस माझा ठरलेला वर्काऊट आणि डाएट फॉलो करतो. त्यामुळे कदाचित मी अजूनही यंग आणि फिट आहे.
अनिल कपूरचा डाएट प्लॅन
अनिल दिवसाची सुरुवात एक कप चहाने करतो. त्याशिवाय दिवसभरात तो भरपूर पाणी पितो. अजूनही तरुण दिसण्यामागे हे मोठे रहस्य आहे. अनिल सकाळी ब्रेकफास्टमध्ये प्रोटीनयुक्त पदार्थ खाण्यास प्राधान्य देतो. त्यामध्ये प्रामुख्याने त्याला ओट्स,उकडलेली अंडी किंवा ऑम्लेट खायाला आवडते. तसेच तो विविध प्रकारची फळे किंवा त्यांचा रस पितो. तो लंचमध्ये फळे, सलाड, चपाती-भाजी किंवा भात खातो. रात्रीच्या जेवणात ग्रिल्ड फिश किंवा चिकन खाणे अनिलला खूप आवडते. काही वेळा तो मिक्स पालेभाज्यादेखील खातो.
अनिलचा वर्काऊट प्लॅन
अनिल आठवड्यातून सहा दिवस वर्काऊट करतो. त्यामध्ये दररोद 2 तास व्यायाम करतो. सुरुवातीला 10 मिनिटे कार्डिओ एक्सरसाईजनंतर 30 ते 45 मिनिटे हॉट योगा करतो. त्यानंतर 1 तासात तो पुश अप्स, पुल अप्स अणि इतर वर्काऊट फॉलो करतो. तसेच अनिल वेळ काढून सायकलिंग करतो. तर काही वेळा जॉगिंगदेखील करतो.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
क्राईम
Advertisement