Gunaratna Sadavarte Majha Katta : गुणरत्न सदावर्ते म्हणाले, "माझी आजी खूप सुंदर होती, रश्मिका मंदानासारख्या हिरोईन तिच्या समोर पानी कम चाय"
Gunaratna Sadavarte Majha Katta : गुणरत्न सदावर्ते यांनी माझा कट्टा या कार्यक्रमात त्यांच्या कुटुंबाबाबत सांगितलं. तसेच हिंदी बिग बॉसच्या ऑफरबाबत देखील त्यांनी या कार्यक्रमात सांगितलं.
Gunaratna Sadavarte Majha Katta : सामाजिक कार्यकर्ते गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर चर्चा देखील केली. गुणरत्न सदावर्ते यांनी माझा कट्टा या कार्यक्रमात त्यांच्या कुटुंबाबाबत सांगितलं. तसेच हिंदी बिग बॉसच्या ऑफरबाबत देखील त्यांनी या कार्यक्रमात सांगितलं.
आजीबाबत काय म्हणाले गुणरत्न सदावर्ते?
गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितलं, "माझी आजी खूप सुंदर होती. रश्मिका मंदानासारख्या सगळ्या हिरोईन तिच्या समोर पानी कम चाय. तिची उंची सहा फूट होती. ती खूप स्लिम होती. तिचा फेस व्ही कट होता. ती दारु तयार देखील करायची आणि ती स्वत: टेस्ट ती देखील करायची."
गुणरत्न सदावर्तेंना आली होती बिग बॉसची ऑफर
तुमच्यावर आधारित एक चित्रपट आला तर तुम्हाला आवडेल का? असा प्रश्न गुणरत्न सदावर्ते यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना गुणरत्न सदावर्ते म्हणाले, "बिग बॉस हिंदीसाठी माझ्याकडे लोकं दोन महिने फेऱ्या घालत होते. अॅग्रीमेंट घेऊन त्यांचा प्रोडक्शन मॅनेजर दोन महिने फेऱ्या घालत होता. जेनला खतरों के खिलाडी हिंदीसाठी विचारण्यात आले होते. त्या लोकांनी सहा महिने वाट पाहिली. आमचं जीवन हे खूप व्यस्थ आहे. फिल्मी जीवनासाठी आमचा जन्म झालेला नाही. गरजवंतांना मदत करण्यासाठी आमचा जन्म झाला आहे."
View this post on Instagram
गुणरत्न सदावर्ते यांच्या बोलण्याच्या स्टाईलबाबत देखील त्यांना प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणाले, "मी पत्रकारीतेचा शिक्षक होतो, पण मी ड्रामा डीपार्टमेंटला नव्हतो. त्यामुळे पत्रकारांना काय लागतं टीव्हीवर हे चांगलच मला ठाऊक आहे."
मराठा आरक्षणाच्या मुद्दायावर देखील गुणरत्न सदावर्ते यांनी चर्चा केली. मराठा समाजाला आरक्षण (maratha reservation) मिळणार नाही आणि त्यांना जरी आरक्षण मिळाले तर ते आरक्षण न्यायालयात टिकणार नाही, असं गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी सांगितलं. कारण मराठा समाज हा मागास ठरत नाही, त्यामुळं मराठा समाजाला आरक्षण मिळणं शक्य होणार नसल्याचे सदावर्ते म्हणाले.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
गुणरत्न सदावर्तेंचा मराठा आरक्षणाला नेमका विरोध का? माझा कट्ट्यावर सांगितलं कारण...