एक्स्प्लोर
'गली बॉय'ची दोन दिवसांत रेकॉर्डब्रेक कमाई
अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री आलिया भट्टचा 'गली बॉय' हा चित्रपट गुरुवारी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून पंसती मिळाली आहे.
मुंबई : अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री आलिया भट्टचा 'गली बॉय' हा चित्रपट गुरुवारी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून पंसती मिळाली आहे. दोन दिवसांत चित्रपटाने जोरदार कमाई केली आहे. चित्रपटाने दोन दिवसांत 32.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
बॉक्स ऑफीसवर झोया अख्तर दिग्दर्शित 'गली बॉय'ने पहिल्या दिवशी चांगली ओपनिंग मिळवली. परंतु प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी चित्रपटाची थोडी घसरगुंडी झाली. परंतु शनिवारी आणि रविवारी चित्रपट मोठी कमाई करेल. तसेच चित्रपट 100 कोटी क्लबमध्ये स्थान मिळवेल अशी अपेक्षा निर्मात्यांनी व्यक्त केली आहे.
'गल्ली बॉय'ने पहिल्या दिवशी (गुरुवारी) 19.40 कोटी आणि दुसऱ्या दिवशी (शुक्रवारी)13.10 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटात झोपडपट्टीत लहानाचा मोठा झालेल्या डिव्हाइन या प्रसिद्ध रॅपरची कथा दाखवण्यात आली आहे.
#GullyBoy dips in metros [marginal] and mass circuits/Tier-2 cities [maximum] on Day 2... Day 3 [Sat] and Day 4 [Sun] should witness substantial growth at metros [target audience]... Strong *extended* weekend on cards... Thu 19.40 cr, Fri 13.10 cr. Total: ₹ 32.50 cr. India biz.
— taran adarsh (@taran_adarsh) February 16, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
बातम्या
राजकारण
Advertisement