Avinash Das Arrested : फिल्ममेकर अविनाश दास अहमदाबाद पोलिसांच्या ताब्यात; जाणून घ्या काय आहे प्रकरण
Avinash Das : अहमदाबाद पोलिसांनी अविनाश दासला ताब्यात घेतले आहे.
Filmmaker Avinash Das Arrested : सिनेनिर्माता अविनाश दासला (Avinash Das) अहमदाबाद पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुंबईतील मढ आयलंडमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. अविनाशने नुकतेच गृह मंत्री अमित शाह यांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोमध्ये अमित शाह आयईएस अधिकारी पूजा सिंघलसोबत दिसून आले होते. त्यामुळेच अहमदाबाद पोलिसांनी अविनाश दास विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अविनाशने राष्ट्रध्वजाचा अपमान करणारा एका महिलेचा मॉर्फ फोटो शेअर केला होता. एफआयआरनुसार अविनाशने फेसबुकवर फोटो शेअर केला होता. त्यामुळेच अविनाश दासवर आयपीसी कलम 469 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Director friend #AvinashDas @avinashonly was arrested today morning by crime branch of Gujarat Police . His anticipatory bail application is pending in Supreme Court . #ISTANDWITHAVINASHDAS pic.twitter.com/qlDw1wVQ9N
— DHOOPASHWINI (@DhoopAshwini) July 19, 2022
अविनाश दासला सध्या अहमदाबाद पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यासंदर्भात माहिती देत सहाय्यक पोलिस आयुक्त डी पी चूडास्मा म्हणाल्या,"अविनाश दासला मंगळवारी अहमदाबाद पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पुढील प्रकियेसाठी अविनाशला अहमदाबादला आणले आहे".
गुन्हा दाखल झाल्यानंतर अविनाशने मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली आहे. 46 वर्षीय अविनाशने 2017 साली आलेल्या स्वरा भास्करच्या 'अनारकली ऑफ आरा' आणि झी 5 च्या 'रात बाकी है' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. अविनाश दासचे अनेक प्रोजेक्ट सध्या पाईपलाईनमध्ये आहेत.
संबंधित बातम्या