एक्स्प्लोर

Adnan Sami : अदनान सामीचा सोशल मीडियाला रामराम? ‘अलविदा’ पोस्टमुळे चाहते संभ्रमात!

Adnan Sami : लोकप्रिय गायक अदनान सामी (Adnan Sami) याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील सगळ्या पोस्ट डिलीट केल्या असून, ‘अलविदा’ म्हणत एक व्हिडीओ शेअर केला आहे.

Adnan Sami : पद्मश्री विजेता लोकप्रिय गायक अदनान सामी (Adnan Sami) याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील सगळ्या पोस्ट डिलीट केल्या असून, ‘अलविदा’ म्हणत एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्याची अलविदा ही पोस्ट पाहून चाहते मात्र संभ्रमात पडले आहेत. या पोस्टमुळे अदनान सामी याने इन्स्टाग्रामला अलविदा केला असावा, अशी अटकळ बांधली जात आहे. मात्र, यावर अदनान याने अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही. अदनानने त्याच्या इन्स्टाग्रामवरील पोस्ट हटवल्या असल्या, तरी ट्विटरवर मात्र सगळ्या पोस्ट दिसत आहेत.

नुकताच अदनानने वजन कमी करून आपल्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. त्याची फॅट टू फिट जर्नी पाहून चाहते देखील भारावून गेले होते. स्वतः अदनान सामीने त्याचे फोटो सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले होते. मात्र, आता त्या फोटोंसह सगळ्याच पोस्ट गायब झाल्याने चाहते नाराज झाले आहे. एकीकडे अदनान सामीने इन्स्टाग्रामला अलविदा केलाय, असे म्हटले जात आहे, तर दुसरीकडे त्याचे काही चाहते म्हणत आहेत की, हा केवळ प्रमोशन फंडा असून, त्याचे आगामी गाणे ‘अलविदा’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

पाहा पोस्ट:

गायक अदनान सामी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर प्रचंड सक्रिय होता. तो अनेकदा आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करून चाहत्यांशी कनेक्टेड राहत होता. मात्र, आता त्याने सगळ्या पोस्ट हटवून केवळ ‘अलविदा’ म्हटल्याने त्याचे चाहते नाराज झाले आहेत.

चाहत्यांच्या प्रतिक्रिया

आपल्या लाडक्या गायकाची अलविदा पोस्ट पाहून चाहते देखील गोंधळले आहेत. या पोस्टवर कमेंट करत ते अदनानला अनेक प्रश्न विचारत आहेत. एका चाहत्याने म्हटले की, ‘अदनान सर तुम्ही ठीक आहात का? काही झाले आहे का?’, तर आणखी एका चाहत्याने लिहिले, ‘मला आशा आहे की, ही केवळ एक पीआर योजना आहे आणि हे असेच असले पाहिजे. तुम्ही ही इंडस्ट्री सोडणार असा मी विचारही करू शकत नाही. तुम्ही बनवलेले संगीत, रचना ते निर्मिती आणि गायन अप्रतिम आहे. तुम्ही सर्वोत्कृष्ट आहात, सर! अल्लाह तुम्हाला आशीर्वाद देईल आणि आशा आहे की, सर्व काही ठीक असेल.’ तर, काही चाहते म्हणत आहेत, ‘तुमच्या नवीन गाण्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा’. आता सगळेच चाहते त्याच्या अधिकृत व्यक्तव्याची वाट पाहत आहेत.

हेही वाचा :

Kiss Day in Bollywood : 'किस डे' निमित्ताने गायक अदनान सामीने शेअर केला बिग बींसोबतचा मजेशीर फोटो

गायक अदनान सामीला 50 लाख रुपयांचा दंड

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Bajpayee On FDA Chief Tukaram Mundhe: 'कर्तव्य बजावणं हा चर्चेचा विषय का?'; मनोज वाजपेयींचं तुकाराम मुढेंच्या धडक कारवायांवर मोठं वक्तव्य
'कर्तव्य बजावणं हा चर्चेचा विषय का?'; मनोज वाजपेयींचं तुकाराम मुढेंच्या धडक कारवायांवर मोठं वक्तव्य
Mandana Karimi Shift India To Dubai: 16 वर्ष भारतात राहिली अन् आता दुबईला शिफ्ट झाली; व्हिडीओतून प्रसिद्ध अभिनेत्रीचे धक्कादायक आरोप, म्हणाली, 'पैसे देऊन माझ्यावर नजर ठेवतायत...'
16 वर्ष भारतात राहिली अन् आता दुबईला शिफ्ट झाली; व्हिडीओतून प्रसिद्ध अभिनेत्रीचे धक्कादायक आरोप, म्हणाली, 'पैसे देऊन माझ्यावर नजर ठेवतायत...'
Toxic Box Office Collection Day 9: 500 कोटींचा खर्च, पण 50% बजेटही वसूल करू शकला नाही सुपरस्टार यशचा 'टॉक्सिक'; 9व्या दिवसाचं हादरवणारं कलेक्शन, आतापर्यंतची कमाई किती?
500 कोटींचा खर्च, पण 50% बजेटही वसूल करू शकला नाही सुपरस्टार यशचा 'टॉक्सिक'; 9व्या दिवसाचं हादरवणारं कलेक्शन, आतापर्यंतची कमाई किती?
Deeol Band 3 Update Pravin Tarde: 'देऊळ बंद'चा तिसरा पार्ट अमेरिकेत! श्री स्वामी समर्थांची भक्ती थेट परदेशात गाजणार; लेटेस्ट अपडेट समोर
'देऊळ बंद'चा तिसरा पार्ट अमेरिकेत! श्री स्वामी समर्थांची भक्ती थेट परदेशात गाजणार; लेटेस्ट अपडेट समोर

व्हिडीओ

Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शक्तिपीठ झाल्यानंतर कोल्हापूरचा विकास अमर्यादित होणार, त्याचा संपूर्ण लाभ जिल्ह्याला मिळणार: खा. धनंजय महाडिक
शक्तिपीठ झाल्यानंतर कोल्हापूरचा विकास अमर्यादित होणार, त्याचा संपूर्ण लाभ जिल्ह्याला मिळणार: खा. धनंजय महाडिक
RBI चा 5  कंपन्यांना दणका, 45 लाख रुपयांचा दंड ठोठावला, नियमाचंं उल्लंघन करणं भोवलं
RBI चा 5  कंपन्यांना दणका, 45 लाख रुपयांचा दंड ठोठावला, नियमाचंं उल्लंघन करणं भोवलं
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
तुझ्यासारखं नागरी नेतृत्व फार गरजेचं, तुझी काळजी वाटते; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीकडून विद्यानंद बापटांना शाबासकी
तुझ्यासारखं नागरी नेतृत्व फार गरजेचं, तुझी काळजी वाटते; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीकडून विद्यानंद बापटांना शाबासकी
Video: बलूचिस्तान लिबरेशन आर्मीनं 25 पाकिस्तानी सैनिकांना ठार करत हाॅलिवुड ॲक्शन चित्रपटाला सुद्धा लाजवेल असा व्हिडिओ सुद्धा व्हायरल केला!
Video: बलूचिस्तान लिबरेशन आर्मीनं 25 पाकिस्तानी सैनिकांना ठार करत हाॅलिवुड ॲक्शन चित्रपटाला सुद्धा लाजवेल असा व्हिडिओ सुद्धा व्हायरल केला!
मी एकनाथ शिंदेंना खूप मानते, मराठी संस्कृतीचं अनुसरुन काम करते; नवी मुंबईत गौतमीचा जलवा, दहीहंडी उत्सवात थिरकली
मी एकनाथ शिंदेंना खूप मानते, मराठी संस्कृतीचं अनुसरुन काम करते; नवी मुंबईत गौतमीचा जलवा, दहीहंडी उत्सवात थिरकली
LIC-ICICI : एलआयसी आणि आयसीआयसीआय बँकेच्या डीलला RBI चा ग्रीन सिग्नल, सोमवारी स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
एलआयसी आणि आयसीआयसीआय बँकेच्या डीलला RBI चा ग्रीन सिग्नल, नेमकं काय घडणार?
संयुक्त राष्ट्राने जगाचा नकाशा बदलला, अमेरिकेनं केला निषेध, नव्या नकाशात आफ्रिका मोठा, तर युरोप-अमेरिका लहान; भारतावर काय परिणाम होणार?
संयुक्त राष्ट्राने जगाचा नकाशा बदलला, अमेरिकेनं केला निषेध, नव्या नकाशात आफ्रिका मोठा, तर युरोप-अमेरिका लहान; भारतावर काय परिणाम होणार?
Embed widget