Trupti Khamkar: 'गोविंदा नाम मेरा'नंतर मी कामवालीची भूमिका साकारणार नाही : तृप्ती खामकर
तृप्तीनं या चित्रपटामधील तिच्या लूकचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. 'बातमीज बाई' असं या फोटोवर लिहिलेलं आहे. एका मुलाखतीमध्ये तृप्तीनं गोविंदा नाम मेरा या चित्रपटातील तिच्या भूमिकेबद्दल सांगितलं.
Trupti Khamkar: सध्या कॉमेडी- थ्रिलर चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. कियारा अडवाणी (Kiara Advani), भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) यांचा मर्डर मिस्ट्रीवर आधारित असलेला गोविंदा नाम मेरा (Govinda Naam Mera) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात तृप्ती खामकर, रेणूका शहाणे, अमेय वाघ, सयाजी शिंदे हे कलाकार देखील महत्वाची भूमिका साकारणार आहेत. अभिनेत्री तृप्ती खामकर ही या चित्रपटात कामवाली बाईची भूमिका साकारणार आहे. तृप्तीनं या चित्रपटामधील तिच्या लूकचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. 'बातमीज बाई' असं या फोटोवर लिहिलेलं आहे. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये तृप्तीनं गोविंदा नाम मेरा या चित्रपटातील तिच्या भूमिकेबद्दल सांगितलं.
तृप्ती ही गोविंदा नाम मेरा या चित्रपटात मंजूबाई ही भूमिका साकारत आहे. तृप्तीनं टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं, 'मी रुपेरी पडद्यावर अशी भूमिका कधीच साकारली नव्हती. त्यामुळे मी थोडीशी अस्वस्थता होते. विकी हा खूप चांगला सहकलाकार आहे. तो तुम्हाला असे वाटू देत नाही की तो हीरो आहे आणि तुम्ही नाही.'
तृप्तीने आता मुख्य भूमिकेशिवाय कामवालीची भूमिका न घेण्याचा निर्णय घेतला आहे. 'मला ही भूमिका मिळाली कारण आपल्या इंडस्ट्रीत टाइपकास्टिंग खूप आहे. कामवालीच्या भूमिकेसाठी मला मुकेश छाबरा यांच्या ऑफिसमधून फोन आला. मी म्हणाले नाही, मला कंटाळा आला आहे कारण मला लोकांनी कामवाली बाई म्हणून जवळपास सगळीकडे पाहिले जाते. पण ते म्हणाले की ही भूमिका वेगळी आहे कारण प्रत्येक पात्राची कथा वेगळी आहे. आता मी धर्मा प्रॉडक्शन्ससाठी बाईची भूमिका साकारल्यानंतर मी कोणासाठी बाई म्हणून काम करणार नाही. जर मुख्य भूमिका असेल तर मला द्या.' असंही तृप्तीनं मुलाखतीमध्ये सांगितलं.
View this post on Instagram
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: