एक्स्प्लोर
माझ्यावरील सिनेमात अक्षयकुमारने भूमिका करावी : मॅकग्रा
मुंबई : क्रिकेटच्या क्षेत्रातील अनेक खेळाडूंचा प्रेरणादायी प्रवास चित्रपटातून सर्वांसमोर येण्यासारखा आहे. महेंद्रसिंग धोनी आणि सचिन तेंडुलकर यांच्यावरील सिनेमा लवकरच मोठ्या पडद्यावर येणार आहेत. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ग्लेन मॅकग्राच्या आयुष्यावरही चित्रपट येणार असल्याची चर्चा आहे.
'परवा कोणतरी म्हणालं माझ्यावर सिनेमा यायला हवा. हॉलिवूड स्टार ह्यूज जॅकमन माझी भूमिका साकारु शकतो. एकतर तो ऑस्ट्रेलियन आहे आणि त्याला क्रिकेटचीही आवड आहे. पण बॉलिवूडमधून एखादं नाव पुढे येण्याची मागणी होत आहे. मला वाटतं अक्षयकुमार योग्य नाव आहे.' असं खुद्द मॅकग्रा म्हणतो.
कसोटी क्रिकेटमध्ये जलदगती गोलंदाजाने सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम त्याच्या नावावर जमा आहे. तीन वेळा विश्वचषक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघात तो सहभागी होता. इतकंच नाही, तर मॅकग्राच्या गोलंदाजीवर खेळणं सर्वात कठीण असल्याची कबुलीही सचिन तेंडुलकरने दिली होती.
'माझ्यावर इतक्यात सिनेमा येईल असं वाटत तरी नाही. पण सचिनवरील सिनेमाची वाट पाहत आहे. त्याचं आयुष्य प्रेरणादायी आहे. फक्त भारतातच नव्हे, तर जगभरात त्याचे चाहते आहेत. त्यामुळे सर्वच जण हा सिनेमा पाहण्यासाठी उत्सुक असतील' अशी खात्री असल्याचंही तो म्हणतो.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement