Gautami Patil : गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात प्रेक्षकांची हुल्लडबाजी; अवघ्या दहा मिनिटात कार्यक्रम पडला बंद
Gautami Patil : नांदेड जिल्हयातील धर्माबाद येथे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं पण प्रेक्षकांच्या गोंधळामुळे हा कार्यक्रम बंद करण्यात आला.
![Gautami Patil : गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात प्रेक्षकांची हुल्लडबाजी; अवघ्या दहा मिनिटात कार्यक्रम पडला बंद Gautami Patil had cancel show10 minutes due to audience in nanded Gautami Patil : गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात प्रेक्षकांची हुल्लडबाजी; अवघ्या दहा मिनिटात कार्यक्रम पडला बंद](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/18/3b412aa3faae3773dba91cbe4b08b5651687061257138254_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Gautami Patil Nanded Show : नांदेड (Nanded) जिल्ह्यातील धर्माबाद येथे लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान प्रेक्षकांनी प्रचंड गोंधळ घातला. त्यामुळे गौतमीला हा कार्यक्रम अवघ्या दहा मिनिटात बंद करावा लागला.
नेमकं प्रकरण काय?
नांदेडमध्ये गौतमीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. गौतमी येण्याआधीच धर्माबादच्या मोंढा मैदानात प्रचंड गर्दी झाली होती. महिलांची संख्या देखील लक्षणीय होती.
रात्री नऊच्या सुमारास गौतमी पाटील मंचावर आली. पण गौतमी पाटील येताच तिच्या चाहत्यांनी गोंधळ सुरू केला. स्टेज जवळ देखील मोठी गर्दी झाली. मैदानात खुर्च्यांची मोडतोड आणि धावपळ सुरू झाली.
गौतमीच्या कार्यक्रमादरम्यान प्रेक्षकांच्या गोंधळामुळे पोलिसांना लाठीमार करावा लागला. हा गोंधळ पाहून गौतमीने पेक्षकाना शांत राहण्याचे आवाहनदेखील केले. पण गोधळ थांबत नसल्याने गौतमीने दहा मिनिटात कार्यक्रम बंद केला. फक्त दोन गाण्यांवर नृत्य सादर करत गौतमी निघून गेली.
'सबसे कातील गौतमी पाटील'चा मोठा चाहतावर्ग आहे. आपल्या नृत्याने तिने सर्वांनाच वेड लावलं आहे. आता नांदेडमध्ये तिच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. शिवसेना शिंदे गटाचे सहसंपर्कप्रमुख आकाश रेड्डी यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. धर्माबाद शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदान परिसरात हा कार्यक्रम पार पडत होता. पण चाहत्यांच्या गोंधळामुळे दहा मिनिटांतच गौतमीला हा कार्यक्रम बंद करावा लागला.
नांदेडमध्ये पहिल्यांदाच गौतमीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गौतमीच्या प्रत्येक कार्यक्रमात चाहत्यांचा मोठा गोंधळ होत असतो. त्यामुळे तिच्या या कार्यक्रमातही नांदेड पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता. काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी व्हिडिओ चित्रीकरण, ड्रोनची मदत घ्यावी लागणार असं कार्यक्रमाआधी सांगण्यात आलं होतं.
आपल्या नृत्यात अश्लील हावभाव करत असल्याने गौतमीवर प्रचंड टीका झाली. पण तरीही तिने आपल्या अदाकरीने महाराष्ट्राला वेड लावलं आहे. बदनामीकडे दुर्लक्ष करत तिने नृत्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. तिचा 'घुंगरू' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गौतमी पाटीलच्या प्रत्येक कार्यक्रमात तुफान राडा, नोटांची उधळण होत असते. गौतमी आपल्या नृत्याला अश्लील कृत्य करत असल्याचा आरोप तिच्यावर अनेकांनी केला होता. पण तरीही तिच्या नृत्याची क्रेझ मात्र कायम आहे.
संबंधित बातम्या
Gautami Patil : गौतमी पाटील विठुरायाच्या चरणी; सगळ्यांना सुखी ठेवण्याचं घातलं साकडं
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)