2022 Movies : 'द कश्मीर फाइल्स'पासून 'भूल भुलैया 2'पर्यंत 'या' भारतीय सिनेमांनी केली सर्वाधिक कमाई
Movies : 2022 मध्ये अनेक सिनेमे प्रदर्शित झाले. यातील काही सिनेमांनी सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घातला.
Highest Grossing Movies of 2022 : 'केजीएफ 2', 'आरआरआर', 'विक्रम', 'वलीमाई', 'बीस्ट', 'द कश्मीर फाइल्स'; 'भूल भुलैया 2', 'गंगूबाई काठियावाडी' असे अनेक बिग बजेट भारतीय सिनेमे 2022 या वर्षात प्रदर्शित झाले. या सिनेमांनी सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घातला. बॉक्स ऑफिसवरदेखील या सिनेमांनी चांगलीच कमाई केली.
आरआरआर : 'आरआरआर' (RRR) या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 1131.1 कोटींची कमाई केली आहे. एस.एस. राजामौलीने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. तर एन.टी. रामा राव ज्यूनिअर, राम चरण, अजय देवगन, आलिया भट्ट या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत.
केजीएफ 2 : 'केजीएफ 2' या सिनेमाने 1228.3 कोटींचा गल्ला जमवला आहे. प्रशांत नील दिग्दर्शित या सिनेमात यश, संजय दत्त, रवीना टंडन, श्रीनिधि शेट्टी मुख्य भूमिकेत आहेत.
विक्रम : 'विक्रम' या सिनेमाने 400.2 कोटींची कमाई केली आहे. लोकेश कनगराजने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमात कमल हासन, विजय सेतुपति, फहद फासिल आणि नारायण मुख्य भूमिकेत आहे.
द कश्मीर फाइल्स : 'द कश्मीर फाइल्स' या भारतीय सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 344.2 कोटींची कमाई केली. या सिनेमात मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर, दर्शन कुमार, पल्लवी जोशी मुख्य भूमिकेत आहेत.
भूल भुलैया 2 : अनीस बज्मी दिग्दर्शित 'भूल भुलैया 2' या सिनेमाने 263.9 कोटींची कमाई केली आहे. या सिनेमात कार्तिक आर्यन, कियारा अडवाणी, तब्बू, राजपाल यादव मुख्य भूमिकेत आहेत.
बीस्ट : 'बीस्ट' या दाक्षिणात्य सिनेमाने 227.3 कोटींची कमाई केली आहे. नेल्सन दिलीपकुमारने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमात थलापती विजय, पूजा हेगडे, के.सेल्वाराघवन मुख्य भूमिकेत आहे.
गंगूबाई काठियावाडी : गंगूबाई काठियावाडी या सिनेमाने 203.9 कोटींची कमाई केली आहे. संजय लीला भंसाळीने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. आलिया भट्ट, शांतनु माहेश्वरी, विजय राज, इंदिरा तिवारी या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत.
वलीमाई : वलीमाई या सिनेमाने 163.2 कोटींची कमाई केली आहे. एच.विनोथने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमात अजित कुमार, हुमा कुरैशी, कार्तिकेय गुम्माकोंडा, बानी जे मुख्य भूमिकेत आहेत.
संबंधित बातम्या