एक्स्प्लोर
‘सैराट’च्या हिंदी रिमेकच्या शूटिंगला सुरुवात, पहिल्या शॉटचे फोटो समोर
करण जोहर निर्मित 'धडक' सिनेमाचं दिग्दर्शन शशांक खेतान करत आहे. 'धडक' हा नागराज मंजुळेच्या 'सैराट' चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे.

मुंबई : श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर आणि शाहिद कपूरचा भाऊ इशान खट्टर 'धडक' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. जान्हवी आणि इशानने आजपासून या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली. आज सकाळी चित्रपटाचा पहिला शॉट चित्रीत झाला. या पहिल्या शॉटचे फोटो समोर आले आहेत. या फोटोमध्ये इशान आणि जान्हवी समुद्रकिनारी बसलेले दिसत असून त्यांच्या हातात 'धडक'चा बोर्डही आहे.
करण जोहर निर्मित 'धडक' सिनेमाचं दिग्दर्शन शशांक खेतान करत आहे. 'धडक' हा नागराज मंजुळेच्या 'सैराट' चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. यात जान्हवी कपूर आर्ची तर इशान खट्टर परशाची भूमिका साकारणार आहे. 'सैराट' चित्रपटाची कथा महाराष्ट्रात घडली होती, मात्र 'धडक'ची कहाणी राजस्थानात घडताना दिसणार आहे.
आर्चीच्या आईची व्यक्तिरेखा जान्हवीची रिअल लाईफ आई म्हणजेच श्रीदेवी साकारण्याची शक्यता आहे. श्रीदेवी यांना सिनेमाची ऑफर देण्यात आली असून त्यांनी अद्याप आपलं उत्तर दिलेलं नाही. मात्र मुलीचं पदार्पण असल्यामुळे त्या ही ऑफर नाकारण्याची शक्यता कमी आहे. हा चित्रपट 6 जुलै, 2018 रोजी प्रदर्शित होणार आहे. संबंधित बातम्या सैराटच्या हिंदी रिमेकमध्ये जान्हवीसोबत श्रीदेवीही झळकणार?
करण जोहर निर्मित 'धडक' सिनेमाचं दिग्दर्शन शशांक खेतान करत आहे. 'धडक' हा नागराज मंजुळेच्या 'सैराट' चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. यात जान्हवी कपूर आर्ची तर इशान खट्टर परशाची भूमिका साकारणार आहे. 'सैराट' चित्रपटाची कथा महाराष्ट्रात घडली होती, मात्र 'धडक'ची कहाणी राजस्थानात घडताना दिसणार आहे.
आर्चीच्या आईची व्यक्तिरेखा जान्हवीची रिअल लाईफ आई म्हणजेच श्रीदेवी साकारण्याची शक्यता आहे. श्रीदेवी यांना सिनेमाची ऑफर देण्यात आली असून त्यांनी अद्याप आपलं उत्तर दिलेलं नाही. मात्र मुलीचं पदार्पण असल्यामुळे त्या ही ऑफर नाकारण्याची शक्यता कमी आहे. हा चित्रपट 6 जुलै, 2018 रोजी प्रदर्शित होणार आहे. संबंधित बातम्या सैराटच्या हिंदी रिमेकमध्ये जान्हवीसोबत श्रीदेवीही झळकणार? श्रीदेवीची मुलगी हिंदी ‘सैराट’मध्ये ‘आर्ची’च्या भूमिकेत?
हिंदी सैराटचं कास्टिंग झालं, जान्हवी ‘आर्ची’, परशा कोण?
‘सैराट’च्या हिंदी रिमेकचं पोस्टर लाँच, सिनेमाचं नाव…
आणखी वाचा























