'BUNTY AUR BABLI 2': 'बंटी और बबली-2' च्या फर्स्ट लूकची चर्चा; सैफ-राणीचा भन्नाट लूक
'बंटी और बबली-2' या चित्रपटातील सैफ आणि राणीचा फर्स्ट लूक नुकताच लॉंच करण्यात आला.
BUNTY AUR BABLI 2 : प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी (Rani Mukherjee) आणि अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) यांचा 'बंटी और बबली-2' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटातील सैफ आणि राणीचा फर्स्ट लूक नुकताच लॉंच करण्यात आला. या चित्रपटात राणी मुखर्जीने फुरसतगंजची फॅशन क्विन बबलीची भूमिका साकारली असून सैफने बंटी उर्फ राकेशची भूमिका साकारली आहे. 22 ऑक्टोबर रोजी बंटी और बबली-2 चित्रपटाचा टीझर लॉंच झाला. या टीझरमध्ये राणी आणि सैफसोबत सिद्धांत चतुर्वेदी आणि शरवरी वाघ देखील दिसत आहेत.
'बंटी और बबली' या चित्रपटामधील राणी आणि सैफच्या फर्स्ट लूकमध्ये सैफ अली खान हातात सिलेंडर घेऊन उभा असलेला दिसत आहे तर राणी ही त्याच्या पोटाचे माप घेताना दिसत आहे. राणीने एका मुलाखतीमध्ये 'बंटी और बबली' या चित्रपटातील तिच्या भूमिकेबद्दल सांगितले, 'विमा म्हणजेच बबली ही छोट्या घरामध्ये गृहिणी होऊन कंटाळली आहे. तीला फॅशन क्षेत्रामध्ये करिअर करायचे आहे. फुरसतगंज या गावामधील लोकांना फॅशनबद्दल काही माहिती नसते त्यामुळे तिला सर्वजण फुरसतगंजची फॅशन क्विन म्हणत असतात.'
'BUNTY AUR BABLI 2': SAIF - RANI FIRST LOOK... #YRF unveils #FirstLook of #SaifAliKhan [as #Rakesh aka #Bunty] and #RaniMukerji [as #Vimmy aka #Babli] in #BuntyAurBabli2... 19 Nov 2021 release. pic.twitter.com/hsEm4LMVN3
— taran adarsh (@taran_adarsh) October 23, 2021
Bunty Aur Babli 2 Teaser : हटके अंदाजातील टीझर प्रदर्शित, प्रेक्षक सिनेमाच्या प्रतिक्षेत
'बंटी और बबली-2' या चित्रपटामध्ये सैफ अली खानने बंटी नावाच्या तिकीट कलेक्टरची भूमिका साकारली आहे. ‘हम तुम’, ‘ता रा रम पम’ या चित्रपटानंतर सैफ आणि राणी यांना 'बंटी और बबली-2' मध्ये एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 'बंटी और बबली- 2' हा चित्रपट 19 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती वरुण वी. शर्मा यांनी केली आहे. वरूण यांनी टायगर जिंदा है आणि सुल्तान या चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शकाचे काम केले. बंटी और बबली हा चित्रपट 2005 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये अभिषेक बच्चनने बंटी ही भूमिका साकारली होती. आता बंटी और बबलीच्या सिक्वेलमध्ये सैफ आणि राणीचा फर्स्ट लूक पाहून प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत.